नवी दिल्ली : भारतात फेसबुकपेक्षा व्हॉट्सअॅप जास्त लोकप्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. एका अहवालनुसार मागील 24 महिन्यात व्हॉट्सअॅप युजर्सच्या संख्येत 30 टक्क्यांने वाढ झाली आहे. मागील काही वर्षांपासून फेसबुक सर्वात लोकप्रिय होते. मात्र व्हॉट्सअॅपने फेसबुकला पिछाडीवर टाकलं आहे. तर तिसऱ्या क्रमांकाची जागा शेअरइटने घेतली आहे.
भारत, ब्राझील, ब्रिटन, जर्मनी आणि कॅनडा या देशांसह अन्य देशातही व्हॉट्सअॅपने बाजी मारली आहे. अॅप अॅनीने द स्टेट ऑफ मोबाईल 2019 च्या अहवालात ही माहिती दिली आहे. महिन्यातील सरासरी वापरकर्त्यांच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅप-फेसबुकनंतर शेअरइटचे युजर्स सर्वाधिक
व्हॉट्सअॅप-फेसबुकनंतर शेअरइटचं युजर्स सर्वात जास्त आहेत. शेअरइटनंतर, फेसबुक मॅसेंजर, ट्रू कॉलर, एमएक्स प्लेयर, यूसी ब्राउझर, इन्स्टाग्राम, अॅमेझन आणि पेटीएमचे युजर्स सर्वाधिक आहेत.
जागतिक स्तरावर फेसबुक पुढेच
भारतासह काही देशांमध्ये व्हॉट्सअॅपचे युजर्स वाढले असले तरी जागतिक स्तरावर अजूनही फेसबुक प्रथम क्रमांकावर आहे. जागतिक स्तरावर व्हॉट्सअॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे. तीसऱ्या क्रमांकावर फेसबुक मॅसेंजरचा नंबर लागतो. यानंतर वीचॅट आणि इन्स्टाग्राम आहे.
भारतात फेसबुकपेक्षा व्हॉट्सअॅप युजर्स सर्वाधिक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2019 11:10 PM (IST)
एका अहवालनुसार मागील 24 महिन्यात व्हॉट्सअॅप युजर्सच्या संख्येत 30 टक्क्यांने वाढ झाली आहे. मागील काही वर्षांपासून फेसबुक सर्वात लोकप्रिय होते. मात्र व्हॉट्सअॅपने फेसबुकला पिछाडीवर टाकलं आहे. तर तिसऱ्या क्रमांकाची जागा शेअरइटने घेतली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -