इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप हा आज संपूर्ण जगात सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग अॅप आहे. वेगवेगळ्या देशांमधील सुमारे 2 अब्ज लोक हे अॅप वापरतात. व्हाट्सएपमुळे लोकांचे जीवन बरेच सोपे झाले आहे यात काही शंका नाही. आता एका क्षणात आपल्याला कोणाला फोटो, संदेश, कॉल अथाव व्हिडिओ कॉल करायचा असेल तर व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला हे सर्व एकाच अ‍ॅपमध्ये शक्य होत आहे.


व्हॉट्सअ‍ॅपचा वाढता वापर पाहता, त्यात येत्या काही दिवसांत आणखी नवीन वैशिष्ट्ये जोडली जात आहेत. इतकेच नाही तर व्हॉट्सअॅप अशी अनेक वैशिष्ट्ये आणत आहे जी तुमच्या सुरक्षिततेसाठीही खूप महत्वाची आहेत. 'एक्सपायरींग मीडिया' ' (Expiring Media) असे या खास फीचरचे नाव आहे. यामध्ये एखाद्यास फोटो, व्हिडिओ, जिफ फाईलसारखी मीडिया फाईल पाठविल्यानंतर किंवा त्या व्यक्तीला चॅटमधून काढून टाकल्यानंतर ती फाईल फोनवरून गायब होईल. चला जाणून घेऊया.


हे वैशिष्ट्य कसे कार्य करेल


जर आपल्याला कोणताही फोटो किंवा इतर फाईल एखाद्याला पाठवायची असेल आणि ती फाईल त्याने एकदा पाहिल्यानंतर लगेच डिलीट करायची असेल तर त्यासाठी एक नवीन फिचरने व्हॉट्सअॅपने आणले आहे. यासाठी आपल्याला View Once या बटणाला क्लिक करावं लागेल. या फिचरमधून पाठविलेल्या मीडिया फाईलवर डेडिकेटेड टाइमर बटणाच्या मदतीने अॅक्सेस करता येणार आहे.


चॅटमध्ये मीडिया फाईल जोडण्यासाठी तुम्हाला त्या बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर, आपण निवडलेल्या फायली कालबाह्य (Expire) होतील.


व्हॉट्सअ‍ॅप अशा मीडिया फाइल्सला टाइमर आयकॉनसह हायलाइट करेल, जेणेकरुन वापरकर्त्याला हे कळेल की चॅटमधून बाहेर आल्यानंतर शेअर केलेली फाईल डिलीट होईल.


इथं पहिल्यापासूनच हे फिचर आहे


व्हॉट्सअॅप व्यतिरिक्त हे फीचर आधीपासूनच स्नॅपचॅट आणि इंस्टाग्रामवर उपलब्ध आहे. इन्स्टाग्राम आपल्या वापरकर्त्यांना थेट संदेशांद्वारे डिसअॅपियरिंग फोटो आणि व्हिडिओ पाठविण्याची परवानगी देतो. त्याच वेळी, इंस्टाग्राम वापरकर्त्याला मीडिया फाइल्स पाठविण्याचा पर्याय देखील देते.


संबंधित बातमी : 


फोर्ब्सच्या मते युट्यूबवर सर्वात जास्त कमाई करणारा 'हा' आहे नऊ वर्षाचा मुलगा