मुंबई : कोट्यवधी गॅझेटप्रेमींचा संदेशांची देवाण-घेवाण करण्यासाठी आवडता पर्याय असलेल्या व्हॉट्सअॅपवर लवकरच व्हिडीओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या स्काईप या मायक्रोसॉफ्टच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये व्हिडीओ कॉलिंगची सुविधा आहे. म्हणजेच भविष्यात व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंगच्या सुविधेनंतर स्काईपशी स्पर्धा करताना दिसेल.


 

 

व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉलिंगची चाचणी पहिल्यांदा आयओएस स्मार्टफोनवर म्हणजेच आयफोनवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ज्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बिटा अॅप वापरण्याची सुविधा आहे, त्यांनाच पहिल्या टप्प्यात ही सुविधा वापरता येईल.

 

 

व्हिडीओ कॉलिंगसोबतच झिप फाईल शेअरिंग सपोर्ट, व्हाईसमेल यासारख्या सुविधाही व्हॉट्सअॅपवर दाखल होण्याची शक्यता आहे. अँड्राईड पोलीस या अँड्राईड ओएसबाबत सातत्याने नवी नवी माहिती पुरवणाऱ्या वेबसाईटने याविषयीचा तपशील जारी केलाय. अर्थातच ही माहिती लीक आहे. व्हिडीओ कॉलिंग फीचरविषयी अजून अधिकृतपणे व्हॉट्सअॅपकडून काहीच अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही.