मुंबई : व्हॉट्सअॅप आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग होत चालला आहे. परंतु जर हे व्हॉट्सअॅप आपल्या मोबाईलमध्ये वापरता आले नाही तर मोठी पंचाईत होऊ शकते. 31 डिसेंबरनंतर जुन्या ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या नोकिया, अॅन्ड्रॉईड आणि अॅपल कंपनीच्या मोबाईल्समध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.
नोकिया मोबाईल्समध्ये एस 40 ही ऑपरेटिंग सिस्टिम एके काळी खूप लोकप्रिय होती. या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या फोनमध्ये 31 डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप चालणार नाही. तसेच अॅन्ड्रॉईड 2.3.7 आणि जुन्या व्हर्जनसोबत आय फोन आयओएस 7 वर 1 फेब्रुवारी 2020 नंतर व्हॉट्सअॅप चालणार नाही.
नोकिया, अॅन्ड्रॉईड आणि आयफोनच्या या जुन्या व्हर्जन्समध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही, अशी माहिती व्हॉट्सअॅपतर्फे देण्यात आली आहे. याआधी व्हॉट्सअॅपने घेतलेल्या निर्णयानंतर Windows Phone 8.0, ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी 10 या मोबाइलमधील WhatsApp 31 डिसेंबर 2017 नंतर बंद झाले होते.