विशेष म्हणजे फक्त ग्रुप चॅटमध्येच हे फीचर वापरता येणार आहे. तुम्ही '@' (अॅट द रेट) टाईप केल्यावर त्या ग्रुपमधील सर्व मेंबर्सची यादी दिसेल. त्यानंतर ग्रुपमध्ये असल्याला कॉन्टॅक्टला टॅग करता येईल. एका मेसेजमध्ये तुम्ही कितीही जणांना टॅग करु शकाल, ग्रुपमध्ये असलेल्या मात्र तुम्ही सेव्ह न केलेल्या नंबरला तुम्ही टॅग करु शकाल.
टॅग केल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव हायपरलिंकमध्ये येईल. अर्थात त्यावर क्लिक केलं की तुम्ही थेट त्या व्यक्तीच्या व्हॉट्सअॅप प्रोफाईलवर जाऊ शकाल. सध्या अँड्रॉईड आणि iOS यूझर्सना ही सुविधा उपलब्ध आहे, मात्र डेस्कटॉप (व्हॉट्सअॅप वेब)साठी हे फीचर सुरु झालेलं नाही.
तुम्ही ज्याप्रकारे एखाद्या मित्राचा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केला असेल, तेच नाव तुम्हाला दिसेल. मात्र ग्रुपमधल्या इतरांनी त्याचं नाव ज्याप्रकारे सेव्ह केलं आहे, त्याप्रमाणेच त्यांना दिसेल. उदा. सोनाली नावाच्या मैत्रिणीचं नाव तुम्ही 'सोनाली माने' असं सेव्ह केलं असल्यास, तुम्हाला 'सोनाली माने' असं दिसेल, मात्र ग्रुपमधल्या दुसऱ्या व्यक्तीने 'सोना' असं सेव्ह केलं असल्यास त्या व्यक्तीला 'सोना' असं दिसेल.
यापूर्वी विशिष्ट मेसेजला रिप्लाय देण्याची सुविधा व्हॉट्सअॅपने उपलब्ध करुन दिली होती. त्याचप्रमाणे फोटो एडिटिंगचेही काही नवीन फीचर्स लवकरच उपलब्ध होणार आहेत.