मुंबई: मोटोरोलानं भारतात आपला नवा स्मार्टफोन मोटो ई3 पॉवर लाँच केला. हा स्मार्टफोन ऑनलॉईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असून याची किंमत 7999 रु. आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगसोबतच कंपनीनं फ्लिपकार्टच्या साथीनं बऱ्याच ऑफरही दिल्या आहेत.
या स्मार्टफोनवर देण्यात आलेली सगळ्यात महत्वाची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. तब्बल 7000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर असणार आहे. तसंच यासोबत No cost EMI असणार आहे. तसंच 599 रुपयांचं 32 जीबी सॅनडिस्क मायक्रोएसडी कार्ड मोफत मिळणार आहे. जर तुम्ही एसबीआयच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डनं पेमेंट केलं तर 800 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट दिली जाईल. ही ऑफर आज रात्री 12 वाजेपर्यंतच असणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5 इंच एचडी 720×1280 पिक्सल डिस्प्ले आहे. यामध्ये 1 गीगाहर्त्झ मीडियाटेक क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आलं असून त्यात 2 जीबी रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16 जीबी इंटरनल मेमरी आहे. तर 128 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.
या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसेच अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो सिस्टमवर आधारित आहे. तसेच यात ड्युल सिम सपोर्ट आहे.
यात 4जी, एलटीई, जीपीएस आणि ब्ल्यूटूथ आणि वायफाय हे फीचरही आहेत. तर याची बॅटरी क्षमता 3500 एमएएच आहे.