Instagram Map Feature : इन्स्टाग्रामचा (Instagram) वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या प्रचंड आहे. विशेषत: तरूणाई या अॅपकडे आकर्षित होते. याच यूजर्ससाठी इन्स्टाग्राम सतत नवीन फिचर अपडेट करत असते. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामने एक नवीन फिचर अपडेट केलं आहे. या नवीन फिचरमध्ये नकाशा जोडण्यात आला आहे. हे नवीन फिचर गुगल मॅपसारखेच (Google Map) दिसत असले तरी त्यात काही बदल करण्यात आले आहेत. इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाचे (Meta) सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी प्लॅटफॉर्मवर शोधण्यायोग्य नकाशा दर्शविण्यासाठी एक इन्स्टाग्राम स्टोरी देखील पोस्ट केली आहे. या नवीन फिचर्ससह असे दिसते की, यूजर्स त्यांच्या जवळील लोकप्रिय ठिकाणे जसे की हॉटेल्ससुद्धा शोधू शकतात आणि श्रेणीनुसार फिल्टर देखील वापरू शकतात. 


हे फिचर कसे काम करेल?


इन्स्टाग्रामवरील मॅपच्या फिचरच्या माध्यमातून आता लोकेशन शोधण्यास अडचण येणार नाही.  शोध संग्रहात जतन करू शकतात तसेच अॅपवर त्यांच्या मित्रांसह स्थान सामायिक करू शकतात. यूजर्स आता थेट एक्सप्लोर पेजमध्ये शहराचे किंवा जवळपासच्या ठिकाणाचे नाव टाईप करू शकतात आणि नकाशावर लोकेशन पाहू शकतात. तथापि, इंस्टाग्राम प्रोफाइलचे लोकेशन शेअरिंग सार्वजनिक असेल तरच यूजर्स ते पाहू शकतील. 


Instagram ने अलीकडेच त्याच्या अॅपमध्ये एक पेमेंट फिचर देखील जोडले आहे. जे यूजर्सना थेट मेसेजद्वारे लहान व्यवसायांमधून खरेदी करण्याचा ऑप्शन देते. नवीन वैशिष्ट्य यूजर्सना चॅटद्वारे इतर कोठेही न जाता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकाधिक लहान व्यवसायांसह खरेदी करण्यास अनुमती देईल.


महत्वाच्या बातम्या :