Netflix Feature : नेटफ्लिक्सने (Netflix) पासवर्ड शेअरींगला (Password Sharing) आळा घालण्यासाठी नवीन फिचर आणणार आहे. यामुळे आता पासवर्ड शेअरींगला आळा बसणार आहे. यापुढे नेटफ्लिक्स अकाऊंटचा पासवर्ड शेअर करताना अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. यासाठी नेटफ्लिक्सने नवीन 'ॲड अ होम' (Add a Home) फिचर आणणार आहे. यानुसार तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड शेअर केल्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. नेटफ्लिक्स पुढील महिन्यात अर्जेंटिना, डोमिनिकन रिपब्लिक, एल साल्वाडोर, ग्वाटेमाला आणि होंडुराससह अनेक देशांमध्ये या नवीन फिचरची चाचणी करणार आहे.
काय आहे 'ॲड अ होम' (Add a Home) फिचर?
जर युजर्सनी अकाऊंटचा पासवर्ड त्यांच्या शेअर केला तर त्यांना त्यासाठी वेगळं शुल्क द्यावं लागेल. बेसिक प्लॅनवर एक अधिक युजर (One Extra Home) जोडता येईल. स्टँडर्ड आणि प्रिमियम प्लॅनवर दोन अधिक युजर (Two Extra Home) वाढवता येऊ शकतील.
पासवर्ड शेअरिंगमुळे नेटफ्लिक्सला मोठं नुकसान
नेटफ्लिक्सच्या एका अकाऊंट आणि पासवर्डचा वापर अनेक युजर्स करत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पासवर्ड शेअरींगमुळे कंपनीच्या सबस्क्रायबर्समध्ये दशकातील सर्वात मोठी घट झाली आहे.
नेटफ्लिक्स आणखी स्वस्त होणार
नेटफ्लिक्स आता स्वस्त OTT स्ट्रिमिंग प्लॅन आणण्याच्या तयारीत आहेत. यासाठी नेटफ्लिक्सने आता मायक्रोसॉफ्टसोबत (Microsoft) हातमिळवणी केली आहे. नेटफ्लिक्स जाहिरातीसह (Ad-Support) असलेल्या सबस्क्रिप्शनसाठी (Subscription Plan) मायक्रोसॉफ्टसोबत भागीदार करणार आहे. नेटफ्लिक्स कंपनीनं सांगितलं आहे की, मायक्रोसॉफ्ट जागतिक तंत्रज्ञा आणि विक्रीमध्ये मदत करेल. नेटफ्लिक्सने एप्रिल महिन्यात अॅड सपोर्ट सबस्क्रिप्शन प्लॅनची घोषणा केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या