मुंबई : व्हॉट्सअॅप दर काही दिवसांच्या अंतराने आपल्या युझर्ससाठी नवनवे फीचर्स अपडेट करत असतं. आता व्हॉट्सअॅपने 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' हे फीचर आणलं आहे. सध्या प्रयोगिक अवस्थेत असणारे हे फीचर लवकरच अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.
व्हॉट्सअॅपवरील ग्रुपमुळे गेल्या काही दिवसात अनेक वाद समोर आले आहेत. ग्रुपमधील कुणीतरी सदस्य काहीतरी वादग्रस्त पोस्ट शेअर करतो आणि त्याचा परिणाम ग्रुप अॅडमिनलाही भोगावा लागतो. त्यामुळे अनेकजण ग्रुप तयार करणे टाळतात. शिवाय अनेक ग्रुपमध्ये वादग्रस्त काही शेअर होत नसले, तरी काही सदस्या दिवसभर खोऱ्याने पोस्ट, फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. या साऱ्या गोष्टींना कंटाळूनच अनेकजण ग्रुपला राम राम करतात. हेच व्हॉट्सअॅपने हेरले असून, त्यासंबंधित नवे फीचर आणले आहे.
काय आहे 'रिस्ट्रिक्ट ग्रुप'?
व्हॉट्सअॅपच्या 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' फीचरमुळे ग्रुप अॅडमिनला काही विशेष अधिकार मिळणार आहेत. 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' हे फीचर ज्यावेळी प्रत्यक्षात येईल, तेव्हा ग्रुप अॅडमिन खऱ्या अर्थाने ग्रुप चालवताना सुटकेचा श्वास घेईल. कारण या फीचरमुळे ग्रुपमध्ये वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या सदस्याला 'रिस्ट्रिक्ट' करता येईल. असे केल्याने संबंधित सदस्य ग्रुपमधील इतर सदस्यांच्या पोस्ट वाचू शकतो, पाहू शकतो, मात्र स्वत: काही पोस्ट करु शकत नाही.
हे फीचर ज्यावेळी सर्व युझर्ससाठी खुले केले जाईल, त्यावेळी ग्रुपच्या सेटिंगमध्ये जाऊन ते वापरता येईल.
दरम्यान, ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या किंवा खोऱ्याने पोस्ट टाकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरणार आहे.
लवकरच व्हॉट्सॅप ग्रुप अॅडमिनसाठी खास फीचर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2018 05:29 PM (IST)
व्हॉट्सअॅपवरील ग्रुपमुळे गेल्या काही दिवसात अनेक वाद समोर आले आहेत. ग्रुपमधील कुणीतरी सदस्य काहीतरी वादग्रस्त पोस्ट शेअर करतो आणि त्याचा परिणाम ग्रुप अॅडमिनलाही भोगावा लागतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -