WhatsApp आपल्या युजर्सचा अनुभव चांगला बनविण्यासाठी नवीन फीचर्स आणत आहे. कंपनीने आता वापरकर्त्यांसाठी आणखी एक उपयुक्त फिरच आणले आहे. व्हॉट्सअॅपने व्ह्यू वन्स (View Once) हे नवीन फीचर लॉन्च केलं आहे. या फिचरचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा मॅसेज वाचला किंवा कोणताही फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तो मॅसेज आपोआप अदृश्य होईल. म्हणजेच, आपण एखाद्यास मॅसेज पाठविल्यास मॅसेज प्राप्त करणारा केवळ एकदाच पाहू शकेल.
हे फिचर कसे काम करणार?
मीडिया रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपने सध्या हे फिचर बीटा वापरकर्त्यांसाठी सादर केले आहे. एकदा View Once फिरचद्वारे आपण अदृश्य होणारा फोटो फोनच्या गॅलरीतून पाठवू शकाल. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, फोटो निवडल्यानंतर आपल्याला दृष्य चिन्हावर टॅप करावे लागेल. आता कोणताही फोटो किंवा व्हिडिओ पाठवताना तुम्हाला एकदा कॅप्शन बारजवळ View Once पर्याय दिसेल. आपल्याला हा पर्याय निवडायचा आहे.
GB WhatsApp Update: जीबी व्हॉट्सअॅप काय आहे? त्याचा वापर कितपत सुरक्षित आहे? जाणून घ्या
मॅसेज एकदा पाहिल्यानंतर स्वयंचलितपणे गायब होणार
आपला कोणताही मॅसेज किंवा व्हिडीओ आता एकदा पाहिल्यानंतर डिलीट होणार नाही. आपण या फिचरद्वारे कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केल्यास समोरच्या व्यक्तीला त्याला एकदा पाहण्याची संधी मिळेल. मॅसेज पाठवणाऱ्याला आपला मॅसेज पोहचला गेला आहे की नाही, तसेच तो समोरच्याने वाचला की नाही हे समजणार आहे. यात मॅसेज रिसिव्ह करणारा त्याला पाहिजे असल्यास त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. असे केल्याने मॅसेज पाठवणाऱ्याला देखील कळणार नाही. व्हॉट्सअॅपवर स्क्रीनशॉट्स ओळखण्याची सध्या कोणतीही यंत्रणा नाही.
हे नवीन फिचर आल्यानंतर आपल्याला आपले पाठवलेले मॅसेज डिलीट करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅपचा चॅटबॉक्स भरणार नाही. तुम्हाला मॅसेजेस पुन्हा पुन्हा डिलिट करण्यापासून ब्रेकही मिळेल.