जेव्हा इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा विषय येतो तेव्हा व्हॉट्सअॅपचे (WhatsApp) नाव सर्वात आधी घ्यावे लागेल. सध्याच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप हा सर्वाधिक वापरलेला मेसेजिंग अॅप आहे. यामध्ये बर्‍याच फीचर्स वापरकर्त्यांना त्यांच्या सोयीनुसार देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, आजकाल ज्याची सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे जीबी व्हाट्सएप (GB WhatsApp). व्हॉट्सअ‍ॅपची ही नवीन आवृत्ती नाही. मात्र, हे पूर्णपणे वेगळं अॅप आहे. त्यामुळेच याचा वापर करताना सावधगिरीने करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.



GB WhatsApp क्लोन अॅप आहे 
GB WhatsApp मध्ये WhatsApp सारखेच संदेश, व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंग करता येते. आपण आपल्यानुसार वॉट्सअॅपचे हे क्लोन अॅप कस्टमाइज करू शकता. याशिवाय जीबी व्हॉट्सअॅपमध्ये अतिरिक्त फीचर्सही देण्यात आले आहेत, ज्यामुळे त्याचा वापर करणे सुलभ होईल. तरीही, याचा वापर करणे धोकादायक ठरू शकते.


धोक्याची सूचना
असे सांगितले जात आहे की जीबी व्हॉट्सअॅप आपल्या फोनवरून महत्त्वाचा डेटा लीक करू शकतो. एवढेच नाही तर याचा वापर केल्याने आपले व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद केले जाऊ शकते. आपण गुगल प्ले स्टोअर वरून जीबी व्हॉट्सअॅप डाउनलोड करू शकत नाही. आपण अधिकृत वेबसाइट किंवा ऑनलाइन पोर्टलवरून केवळ एपीके फाइलच्या मदतीने डाउनलोड करू शकता. त्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी आपण ते डाउनलोड न करणे योग्य आहे.


WhatsApp मध्ये हे फिचर डिसेबल करा


बर्‍याचदा आपण पाहतो की आपलं व्हॉट्सअॅप हँग होतं किंवा स्लो प्रोसेस होते. अशा परिस्थितीत काय करावे हे आपल्याला कळत नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टोरेजसोबत फोनचे स्टोरेजही वाढत असते. आपण व्हॉट्सअॅप चॅटमधील अनावश्यक फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट यासारख्या गोष्टी डिलीट करत नाही. त्यामुळे आपलं व्हॉट्सअॅप हँग होतं. या स्टोरेजच्या वाढीमुळे फोन हळूहळू स्लो काम करण्यास सुरुवात करतो. यासाठी आपण व्हॉट्सअ‍ॅपवर ऑटो सेव्ह मीडिया फाइल्सचा पर्याय डिसेबल करू शकता. ज्यानंतर आपल्याला पाहिजे असलेली केवळ मीडिया फाइल आपल्या फोनमध्ये जतन होईल आणि फोनमधील स्पेस वाढेल.