मुंबई : 2018 या वर्षांत व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी अनेक नवनवे फिचर्स आणले. यंदादेखील व्हॉट्सअॅपकडे युजर्ससाठी नवनव्या फिचर्सचा खजिना आहे. काही फिचर्सचे टेस्टींग पूर्ण झाले आहे. तर काही फिचर्सचे टेस्टींग सुरु आहे. येत्या काळात टप्प्या टप्प्याने टेस्टींग पूर्ण करुन नवे फिचर्स युजर्सच्या मोबाईलवर दाखल होतील.
हे आहेत नवे फिचर्स
1. एका वेळी अनेक व्हॉईस मेसेज ऐकू शकतो
सध्या एका वेळी एकच व्हॉईस मेसेज ऐकता येतो, प्रत्येक व्हॉईस मेसेज ऐकण्यासाठी प्रत्येक वेळी प्ले करावे लागते. ही समस्या आता सुटेल.
2. स्टिकर्स सर्च करु शकतो
एखाद्या प्रसंगी चॅट करताना हवे ते स्टिकर आपल्याला सापडत नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप स्टिकर सर्चचा नवा ऑप्शन घेऊन येत आहे.
3. व्हॅकेशन मोड, सायलेंड मोड
आपण फिरायला गेलो, सुट्टीवर असू तेव्हा व्हॉट्सअॅप मेसेजेसमुळे डिस्टर्ब होतो. अशा वेळी मेसेजेसच्या त्रासापासून सुट्टी मिळवण्यासाठी व्हॅकेशन मोड किंवा सायलेंट मोड हे नवे फिचर दाखल होणार आहे.
4. व्हॉट्सअॅप लिंक अकाऊंट
सध्या या फिचरचे टेस्टींग सुरु आहे. व्हॉट्सअॅपद्वारे बिझनेस करणाऱ्यां लोकांनी एकापेक्षा अधिक अकाऊंट एकमेकांशी जोडले तर त्याचा त्यांना अधिक फायदा होईल. अशा लोकांसाठी व्हॉट्सअॅप लिंक अकाऊंट हे नवे फिचर युजर्सना मिळणार आहे.
5. डार्क मोड
डार्क मोड हे फिचर सध्या ट्विटर, यूट्यूब, गुगल मॅप्स आणि गुगल मेसेज या अॅप्समध्ये आहे. व्हॉट्सअॅपही या फिचरची टेस्ट करत आहे.
6. क्यूआर (QR) कोडच्या मदतीने शेअरींग
क्यूआर कोडच्या मदतीने कॉन्टॅक्ट्स किंवा फाईल्स शेअर करता येतील.
7. मल्टी शेअर फाईल्स
या फिचरच्या मदतीने एकावेळी पीडीएफ, ऑडिओ आणि एकापेक्षा अधिक कॉन्टॅक्ट्स शेअर करता येतील.
8. मेसेज प्रीव्ह्यू
मेसेज सेंड केल्यानंतर कसा दिसेल हे मेसेज सेंड करण्यापूर्वी पाहता येईल. त्यासाठी मेसेज प्रीव्ह्यू हे फिचर वापरता येईल.
9. नोटीफिकेशनमध्ये व्हिडीओ पाहा
व्हॉट्सअॅपवर आलेला व्हिडीओ मोबाईलच्या नोटीफिकेशनमध्ये पाहता येऊ शकतो. या फिचरच्या मदतीमुळे आपण व्हिडीओ पाहिला असला तरी आपण तो व्हिडीओ पाहिला आहे, ही गोष्ट मेसेज पाठवणाऱ्याला समजणार नाही.