व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपवर आता लवकरच जाहिराती पाहायला मिळणार आहेत. 2020 या वर्षात व्हॉट्सअॅपवर जाहिराती सुरु होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. यामुळे कुठल्याही जाहिरातींच्या अडथळ्याविना व्हॉट्सअॅपवर चॅटिंगचा आनंद घेणाऱ्या व्हॉट्सअॅप युजर्सना येत्या काळात मात्र त्रास सहन करावा लागणार असं दिसतंय.
जगभरात करोडो युजर्स असलेल्या व्हॉट्सअॅपवर जाहिरीती नसल्याने अनेक लोक या अॅपला पसंती देतात. काही वर्षांपूर्वी फेसबूकने व्हॉट्सअॅप ही कंपनी विकत घेतली आहे. त्यानंतर व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतील का? अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार नसून जाहीराती मात्र पाहाव्या लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर जाहीराती सुरु करण्याबाबत फेसबुककडून सांगण्यात आले होते. त्यानंतर आता 2020 मध्ये या जाहीराती सुरु होतील अशी माहिती मिळत आहे. व्हॉट्सअॅपच्या स्टेटस स्टोरीजमध्ये या जाहीराती दिसणार आहेत. त्यामुळे चॅटिंग करताना या जाहिरातींचा काही त्रास नसणार असं सध्या तरी दिसतंय. मात्र स्टेटस स्टोरीज पाहताना जाहिराती पाहाव्या लागू शकतात. व्हॉट्सअॅपचं स्टेटस स्टोरीज फिचर देखील बरंच लोकप्रिय आहे. या स्टेटस स्टोरीजमध्ये टेक्स्ट, फोटो, व्हिडीओ शेअर करता येतात.
व्हॉट्सअॅपवर लवकरच जाहिराती सुरु होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 May 2019 01:11 PM (IST)
काही वर्षांपूर्वी फेसबूकने व्हॉट्सअॅप ही कंपनी विकत घेतली आहे. त्यानंतर व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतील का? अशी चर्चा सुरु झाली होती.
फोटो : गेट्टी इमेज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -