नवी दिल्ली : मॅसेंजर अॅप्लिकेशन WhatsApp आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. अशातच आता कंपनीने 'मल्टी डिवाइस लॉग इन' पासून इतर फिचर्सवरही काम करत आहे. याचबरोबर आता याला जास्त उपयोगी आणि संदुर करण्यासाठी कंपनीने तयारी सुरु केली आहे. कंपनी कंम्प्युटरमध्ये वापरण्यात येणाऱ्या 'व्हॉट्सअॅप वेब' साठी नवं फिचर घेऊन आली आहे. तसेच काही नव्या थीमसुद्धा युजर्ससाठी उपलब्ध करून देणार आहे.


नव्या रंगात उपलब्ध होणार थीम


फेसबुकची मालकी असणारं व्हॉट्सअॅप आधीपासूनच लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी 'डार्क थीम' लॉन्च केली होती. आता रंगांच्या आदारावर वेगवेगळ्या थीम तयार करण्यात येणार आहेत. त्यावर सध्या काम सुरु आहे.


व्हॉट्स अॅपमध्ये नव्या अपडेट्सवर नजर ठेवणारी वेबसाइट WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी ग्रे, येलो आणि ग्रीन कलर थीमवर काम करत आहे आणि डार्क थीमसोबतच या थीमही युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सांगितलं.


WhatsApp Web मध्ये ग्रुप व्हिडीओ कॉन्फरन्सिंग


WhatsApp Web ला अत्यंत उपयोगी बनवण्यासाठी कंपनीने जोर लावला आहे. आतापर्यंत Web मध्ये याचा वापर मेसेजिंगसाठी केला जात होता. कॉलिंगची सुविधा यामध्ये नव्हती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी आता Web मध्येही कॉलिंगचं फिचर उपलब्ध करून देणार आहे. यावर काम सुरु असून लवकरच व्हॉट्सअॅप वेबवरही ग्रुप व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.


WhatsApp पेमेंट सर्विस


ट्सअॅप आपल्या युजर्ससाठी पेमेंट सर्विस आणणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतात बीटा टेस्टिंग सुरु आहे. पेमेंट मेथडमध्ये येणाऱ्या काही अडचणींमुळे भारतात WhatsApp Pay अजुनपर्यंत अधिकृतपणे लॉन्च करण्यात आलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, व्हॉटसअॅप पे मे अखेरपर्यंत भारतात लॉन्च करण्यात येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


फेक न्यूजला आळा घालण्यासाठी WhatsAppचं नवं फिचर


भारतात WhatsApp Pay होणार लॉन्च; Google Pay आणि Paytm देणार टक्कर