नवी दिल्ली : स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. अनेक कंपन्याही नवनवीन फिचर्ससही ग्राहकांसाठी स्मार्टफोन लॉन्च करत असतात. सॅमसंग, हुवावे आणि मोटोरोला फोल्डेबल स्मार्टफोन घेऊन आले आहेत. तर आता अॅपलही फोल्डेबल स्मार्टफोन घेऊन येण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी पुढच्या वर्षी हा फोन लॉन्च करू शकते.
पुढच्या वर्षी अॅपल लॉन्च करू शकते फोल्डेबल आयफोन
असं सांगण्यात येत आहे की, iPhone 12 सीरीजनंतर फोल्डेबल आयफोन लॉन्च करण्यात येणार आहे. आयफोन 12 सीरीजमध्ये चार फोन लॉन्च करण्यात येऊ शकतात. जे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मार्केटमध्ये येऊ शकतात. त्यानंतर कंपनी फोल्डेबल आयफोन लॉन्च करणार आहे.
Samusung Z Flip सारखं असू सकतं डिझाइन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅपन आपला फोल्डेबल फोनला iPhone Flip असं नाव देऊ शकतं. या फोनची डिझाइन Samsung Z Flip प्रमाणे असू शकतं, अशा चर्चा सुरु आहेत. हा फोन मधून फोल्ड होणार आहे. तसेच हा फोन ट्रिपल रियरसोबत लॉन्च करण्यात आला होता.
83 हजार रूपयांपर्यंत असू शकते किंमत
असं सांगण्यात येत आहे की, अॅपल लहान आणि स्वस्त फोल्डेबल फोन लॉन्च करू शकते. याची किंमत 1099 डॉलर म्हणजेच, जवळपास 83 हजार रूपयांपर्यंत असू शकते. याव्यतिरिक्त कंपनी याला गॅलेक्सी फोल्ड यांसारख्या लूकमध्ये बाजारात येऊ शकतो. त्यामुळे कदाचित याची किंमत जास्त असू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
भारतीय ग्राहकांची प्रतिक्षा संपली; 15 जूनला पहिल्यांदा ऑनलाईन सेलमध्ये उतरणार OnePlus 8 Pro 5G
Twitter fleets | तुम्हाला ट्विटरचं नवं फिचर माहिती आहे का?
वर्षभरासाठी दररोज 1.5 GB डाटा देणारे खास प्लान्स; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
प्ले स्टोअरवरून हटवलं Remove China Apps; गूगलकडून कारण मात्र अस्पष्ट