वाशिम : वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये ग्रुप अॅडमिनने स्वत: प्रोफाईल फोटो बदलून आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी अॅडमिनवर रिसोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अॅडमिनला अटक करण्यात आली. रिसोडमधील वाकदमध्ये ही घटना घडली.

वाकद गावातील हरीश भारत झीजान यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. वाकद येथील आरोपी शाहरुख खा. अलीयार खा. यांनी ‘ऑल इन वन ग्रुप’ हा ग्रुप बनवला होता. त्याने फुलपाखराचा चित्र असलेला प्रोफाईल फोटो बदलून त्याठिकाणी आक्षेपार्ह फोटो टाकला.

या प्रकारामुळे वाकद गावात काही तणावाच वातावरण निर्माण झाला होता. तसेच रिसोड ते मेहकर मार्ग वाकद येथे काही तास बंद ठेवण्यात आला. अखेर पोलिसांनी शाहरुख खा. अलीयार खा. या ग्रुप अॅडमीनवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. याप्रकारी रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश डुकरे पाटील यांनी एबीपी माझाशी काहीही बोलण्यास नकार दिला.