नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते भारतातला पहिला पॅनिक बटणचा फोन लाँच करण्यात आला. एलजीने हा फोन बाजारात आणला आहे. K10 2017 असं या मॉडेलचं नाव आहे.


या मोबाईलच्या मागे पॅनिक बटण देण्यात आलं आहे. सलग तीन वेळा पॅनिक बटण दाबल्यानंतर फोन 112 या राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांकाशी कनेक्ट होईल. या नंबरवरुन पोलीस, अग्नीशमन, रुग्णवाहिका या सेवांची मदत घेतली जाऊ शकते.

नेटवर्क नसतानाही हा फोन काम करु शकेल. मात्र जीपीएस सुविधा या फोनमध्ये जानेवारी 2018 पासून सुरु करण्यात येईल.

सर्व प्रकारच्या फोनमध्ये पॅनिक बटण ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने एप्रिल 2016 मध्येच दिले होते. पॅनिक बटणमुळे आपत्कालीन सुविधा तातडीने मिळवणं शक्य होईल.