मुंबई : रिलायन्स जिओने मोफत सेवा बंद केल्यानंतर आता ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहे. मात्र आयडिया, व्होडाफोन आणि एअरटेल या आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांनी जिओला टक्कर देण्यासाठी योजना आखली आहे.


जिओने 303 रुपये प्रति महिना दराने अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि महिन्याला 30 GB ( प्रति दिन 1 GB ची मर्यादा) डेटा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आयडिया, व्होडाफोन आणि एअरटेल जिओपेक्षा डेटा दर कमी करु शकतात, असं दूरसंचार क्षेत्रातील तज्ञांचं मत आहे.

काय आहे जिओ प्राईम मेंबरशिप?

सध्या जिओ वापरत असलेल्या किंवा 31 मार्चपर्यंत जिओ सिम घेतील अशा ग्राहकांना 99 रुपयात प्राईम मेंबरशिप घेता येईल. या ऑफरनुसार जिओची मोफत 4G डेटा सेवा आणखी एक वर्षासाठी मिळेल. 1 मार्च ते 31 मार्च या काळात मेंबरशिपसाठी नोंदणी करता येईल.

जिओचे नवे दर आणि मेंबरशिपचे इतर फायदे लवकरच जिओ अॅपवर जाहीर केले जातील. मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना जिओचे सर्व अॅप एक वर्षासाठी मोफत वापरता येतील. तर जिओच्या सहयोगी कंपन्यांच्या ऑफर्सचाही लाभ घेता येईल.

मेंबरशिप घेतल्यास 303 रुपये प्रतिमहिना दराने 31 मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा (1GB प्रतिदिन) वापरता येईल. म्हणजेच आता जिओ वापरण्यासाठी प्रतिदिन 10 रुपये खर्च येणार आहे.

एअरटेलची ऑफर :

  • 345 रुपयात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 1GB 4G डेटा (व्हॅलिडिटी 28 दिवस)

  • 1495 रुपयात तीन महिन्यांसाठी 30GB 4G डेटा


व्होडाफोनची ऑफर :

  • 349 रुपयात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 50MB 3G किंवा 4G डेटा (व्हॅलिडिटी 28 दिवस)

  • 1500 रुपयात तीन महिन्यांसाठी 35 GB डेटा


आयडियाची ऑफर :

  • 348 रुपयात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 1GB 3G किंवा 4G डेटा (व्हॅलिडिटी 28 दिवस)

  • सिम 4G मध्ये अपग्रेड केल्यास अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 4GB 4G डेटा


संबंधित बातम्या :

1 एप्रिलपासून व्हॉईस कॉलिंग मोफत, अंबानींकडून नव्या ऑफरची घोषणा


जिओची प्राईम मेंबरशिप न घेतल्यास काय होईल?


जिओ मार्चनंतर आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत?


रिलायन्स जिओ 1500 रुपयांहून कमी किंमतीचा 4G स्मार्टफोन लॉन्च करणार?


रिलायन्स जिओ इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्येही नंबर वन!


व्हायरल सत्य : 18 जानेवारीनंतर जिओ सिम बंद होणार?