''तुमचं व्हॉट्सअॅपचं सबस्क्रिप्शन संपलेलं आहे. तुमचं अकाऊंट व्हेरीफाय करण्यासाठी आणि 0.99 ब्रिटिश पाऊंटमध्ये लाईफटाईम सबस्क्रिप्शन घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा'', असं व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये म्हटलेलं आहे.
मात्र या लिंकवर कुणीही क्लिक करु नये. कारण या लिंकद्वारे हॅकर्स तुमचा पर्सनल डेटा हॅक करत आहेत. ज्यामध्ये तुमचा बँक तपशील, महत्वाचे फोटो, व्हिडिओ यांचा समावेश असतो.
https://twitter.com/alignitadvisor/status/869973225698152449
व्हॉट्सअॅप युझर्स ट्विटरच्या माध्यमातून सध्या या मेसेजविषयी सावधान करत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसातील सायबर अटॅक पाहता कोणत्याही मेसेजवर किंबहुना लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे.