YU यूरेका स्मार्टफोन लाँच, किंमत 8,999 रुपये
एबीपी माझा वेब टीम | 01 Jun 2017 04:20 PM (IST)
मुंबई: मायक्रोमॅक्सनं आपला नवा स्मार्टफोन YU यूरेका लाँच केला आहे. याची किंमत 8,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 5 जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. YU यूरेका ब्लॅक कलर व्हेरिएंट असणार आहे. याच्या स्पेसिफिकेशनचा विचार केला असता. यामध्ये 5 इंच स्क्रीन असणार आहे. तसंच यामध्ये रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. यामध्ये ऑक्टाकोअर क्लॉकॉम स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम देण्यात आलं असून 32 जीबी इंटरनल मेमरीही आहे. जी एसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. या स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 3000 mAh बॅटरी आहे. तसेच यामध्ये तब्बल 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून यात 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय फिंगरप्रिंट सेंसर होमबटण देण्यात आलं आहे. YU सीरीजमध्ये 2014 पासून आतापर्यंत 9 स्मार्टफोन लाँच करण्यात आलं आहे.