टेक न्यूज : बर्‍याचदा लोकांना स्मार्टफोनमध्ये स्टोरेजची समस्या असते. अनेकदा अशी वेळ येते की जेव्हा आपल्याला फोटो क्लिक करायचा असतो आणि फोन स्टोरेज पूर्ण होतो. स्टोरेज फूल झाल्यामुळे, बरेच महत्वाचे फोटो क्लिक न करता सोडले जातात. याशिवाय स्टोरेज कमी असल्यानेअनेक अ‍ॅप्सही डाऊनलोड करता येत नाहीत. अशा परिस्थितीत आपण या समस्येतून बाहेर येण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स वापरुन पाहू शकता.


कॅशे क्लिअर करा


फोनमधील स्पेस वाढवण्यासाठी, सेटिंग्जमध्ये जा आणि कॅशे क्लिअर करा. तसेच उपयुक्त नसलेले अ‍ॅप्स हटवून स्टोरेज वाढवला जाऊ शकतो. फोनमध्ये अधिक डेटा असल्यास कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करा. यासह आपला डेटाही सुरक्षित राहील आणि फोनमधील जागाही मोकळी होईल.


अटॅच फाईल डिलिट करा


अनेकदा ईमेलसह जी अटॅच फाईल येते आपण तीही डाऊनलोड करतो. ज्यामुळे आपल्या फोनचा स्टोरेज वाढतो. जर अटॅच केलेली फाईल उपयुक्त नसेल तर ती डिलीट करा. 


अनावाश्यक फोटो डिलीट करा


अ‍ॅप्स डिलीट केल्यानंतरही जर स्टोरेज कमी असेल तर फोनच्या गॅलरीत नको असलेले फोटो आणि व्हिडीओ डिलीट करा. यामुळे बराच स्पेस मिळू शकतो. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे फोटो आणि व्हिडीओ वेळोवेळी डिलीट करा.


आयफोनमध्ये स्पेस कसा वाढवावा


आयफोन यूजर्सनी त्यांच्या फोनमधील स्पेस वाढवण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन स्टोरेज आणि आयक्लाऊडवर जावे. यानंतर मेन स्टोरेजवर जाऊन नको असलेल्या फाईल डिलीट करा.