नवी दिल्ली : ट्विटर (Twitter) युजर्स मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म लाँच झाल्यापासून एडिट (edit) बटण देण्याची मागणी करत आहेत. शब्दाची मर्यादा वाढविणे, डार्क मोडचा (dark mode) पर्याय यासारख्या अनेक मागण्या वापरकर्त्यांकडून होत आहेत. मात्र, एडीट बटनचा पर्याय अद्यापतरी आलेला नाही. पण, आता अनडो (undo) पर्याय देण्यात आला आहे. ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन असणाऱ्यांना हे फिचर वापरता येणार आहे.
ट्विटर ब्लू ही सोशल मीडिया कंपनीची पहिली सबस्क्रिप्शन ऑफर आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंपनी आपला महसूल स्रोत वाढवत आहे. सध्या कंपनीचा व्यवसायाचा मुख्य स्रोत हा जाहिरात विक्रीतून येत आहे.
ही सेवा आता ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये उपलब्ध आहे. ही सेवा भारतात कधी उपलब्ध होईल याबद्दल काही सांगण्यात आले नाही. परंतु, सबस्क्रिप्शनची किंमत एप्पल स्टोअरवर (iOS) भारतात दरमहा 269 रुपये दाखविणाl येत आहे.
ट्विटर ब्लूची वैशिष्ट्ये
- सध्या, ट्विटर ब्लू वापरकर्त्यांकडे तीन प्रीमियम वैशिष्ट्यांमध्ये अक्सेस मिळणार आहे. पूर्ववत करा ट्विट (Undo Tweet), बुकमार्क फोल्डर्स (Bookmark Folders), वाचक मोड (Reader Mode), कस्टमायजेबल ट्विटर आयकोन्स आणि रंगीत थीम या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
- अनडो ट्विट यातून नावाप्रमाणेच ट्वीट पूर्ववत करता येणार आहे, ट्विटर वापरकर्त्यांना आधीचे पोस्ट केलेले ट्विट पूर्ववत करण्याची परवानगी या मिळणार आहे.
- बुकमार्क फोल्डर्स हे फिचर वापरुन वापरकर्त्यांना बुकमार्कची व्यवस्थित यादी तयार करता येणार आहे. यात पूर्वीसारखा गोंधळ होणार नाही.
- वाचक मोड वापरकर्त्यास ट्विट थ्रेड वाचन सोपं होणार आहे. थ्रेडला मजकूरात रूपांतरित करणे आणि वाचन करणे यामुळे सुलभ होईल. थ्रेडमधील सर्व ट्वीटस एकाच स्क्रीनमध्ये एकत्रित दिसणार आहे.
- भिन्न रंगीत थीम्स ट्विटर ब्लूच्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या रंगाच्या थीम त्यांच्या UI मध्ये समाविष्ट करण्यास आणि मुख्य ट्विटर चिन्हाचा रंग डीफॉल्ट निळ्यापासून गुलाबी, जांभळा, पिवळा किंवा नारिंगीमध्ये करता येणार आहे.
ट्विटर ब्लू ट्विटरच्या 'ब्लू टिक' शी संबंधित नाही
हे लक्षात ठेवा की ट्विटर ब्लू ही सशुल्क, मासिक सदस्यता-आधारित योजना आहे जी वापरकर्त्यांना अतिरिक्त वैशिष्ट्ये प्रदान करते. ट्विटरवर 'ब्लू टिक' मिळविण्याशी या सेवेचा काहीही संबंध नाही. निळी टिक सुप्रसिद्ध खात्यांना दिलेली ओळख आहे.