Apple iPhone 14 Launch : दिग्गज टेक कंपनी Apple  उद्या म्हणजे 7 सप्टेंबर रोजी चार नवीन iPhones (iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max) लॉन्च करणार आहे. भारतीय वेळेनुसार Apple iPhone 14 सीरिजचा लॉन्च इव्हेंट रात्री 10:30 वाजता सुरू होईल. आयफोन 12 आणि आयफोन 13 सह, कंपनीने 4 मॉडेल लॉन्च केले होते. त्याचप्रमाणे आयफोन 14 चे चार मॉडेल लॉन्च केले जाण्याची अपेक्षा आहे. मात्र यामध्ये मिनी मॉडेलचा समावेश नसणार, अशी चर्चा आहे. iPhone 14 रेंजमध्ये iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांचा समावेश असेल.


iPhone14 सीरिज किंमत 


आयफोन 14 सीरिजच्या किमती काही मीडिया रिपोर्ट्सद्वारे लीक झाल्या आहेत. या मीडिया रिपोर्टनुसार, iPhone 14 ची किंमत 749 डॉलर्स (भारतीय चलनात 59,440 रुपये), iPhone 14 Max ची किंमत 849 डॉलर्स (भारतीय चलनात 67376 रुपये), iPhone 14 Pro ची किंमत 1,049 डॉलर्स (भारतीय चलनात 83248 रुपये) आणि iPhone 14 Pro Max ची किंमत 1,149 डॉलर्स (भारतीय चलनात 91184 रुपये) आहे.  मात्र जास्त करांमुळे भारतात याची किमती जास्त असू शकतात. आयफोन 14 आणि आयफोन 14 मॅक्समध्ये A15 बायोनिक चिप दिली जात आहे. तर इतर दोन मॉडेल्समध्ये A16 बायोनिक चिप दिली जाईल, असा दावाही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.


आयफोन 14 लॉन्च इव्हेंट कसा पाहायचा?


Apple च्या iPhone 14 सीरिजचा लॉन्च इव्हेंट कॅलिफोर्नियातील मुख्यालयात आयोजित केला जाणार आहे. परंतु तुम्ही तो घरी बसूनही पाहू शकता. Apple लॉन्च इव्हेंटचे ऑनलाइन स्ट्रीमिंग देखील केले जाणार आहे. Apple आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबसह वेबसाइटवर आयफोन 14 लॉन्च इव्हेंट ऑनलाइन स्ट्रीम करणार आहे. तुम्ही यापैकी कोणत्याही प्लॅटफॉर्मला भेट देऊन लॉन्च इव्हेंट थेट पाहू शकता.


महत्वाच्या बातम्या :