मुंबई : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये धडाकेबाज एन्ट्री करत रिलायन्स जिओने सर्वच स्पर्धक कंपन्यांना हादरे दिले. सुरुवातीला पूर्णपणे मोफत, नंतर आकर्षक ऑफर्स यांसह इतर कंपन्यांच्या ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यात आणि नव्या ग्राहकांना बांधून ठेवण्यात रिलायन्स जिओ कंपनी यशस्वी ठरली. या जिओच्या प्राईम मेंबरशिप ऑफरची मुदत 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न जिओच्या ग्राहकांना पडला आहे.
सप्टेंबर 2016 मध्ये लॉन्च झालेल्या जिओने स्वस्त इंटरनेट डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलच्या ऑफर्सद्वारे लाखोंच्या संख्येत ग्राहक जमा केले. गेल्या वर्षी एप्रिल 2017 मध्ये प्राईम मेंबरशिप सुरु करण्यात आली. या ऑफरनुसार 99 रुपयात ग्राहक प्राईम मेंबरशिप घेऊ शकत होते आणि या प्राईम मेंबर्सना वेगवेगळ्या आकर्षक ऑफर मिळत असत. ही प्राईम मेंबरशिप येत्या 31 मार्चला संपणार आहे. म्हणजे अवघे चार-पाच दिवस उरले आहेत.
रिलायन्स जिओ नवीन ऑफर देणार?
रिलायन्स जिओची प्राईम मेंबरशिप ऑफर संपल्यानंतर काय, याबाबत दोन अंदाज व्यक्त केले जात आहेत. पहिला अंदाज म्हणजे, प्राईम मेंबरशिप ऑफरची मुदत वाढवली जाईल आणि दुसरा अंदाज म्हणजे, प्राईम मेंबरशिप ऑफर बंद करुन त्याऐवजी 99 रुपयांची मोफत सर्व्हिसची ऑफर दिली जाईल. या अंदाजांपलिकडेही अशीही चर्चा आहे की, जिओ आपल्या ग्राहकांसाठी नव्या कोऱ्या ऑफर्स आणू शकते.
रिलायन्स जिओने स्वस्त इंटरनेट डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलनंतरही ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी प्राईम मेंबरशिपची आयडिया आणली होती. आता प्राईम मेंबरशिपची मुदतही संपते आहे. त्यामुळे आता जिओ काय घेऊन येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जिओची प्राईम मेंबरशिप ऑफर 31 मार्चला संपणार, पुढे काय?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Mar 2018 11:05 PM (IST)
रिलायन्स जिओने स्वस्त इंटरनेट डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलनंतरही ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी प्राईम मेंबरशिपची आयडिया आणली होती. आता प्राईम मेंबरशिपची मुदतही संपते आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -