नवी दिल्लीः रिलायन्स जिओ सिम घेण्यासाठी ग्राहकांची सध्या उडी पडली आहे. हे सिम केवळ दोनच रंगांच्या पॉकेटमध्ये उपलब्ध आहे. मात्र या दोन रंगांमागे काय कारण आहे, असा प्रश्नही कोणाला पडला नसेल.


ऑरेंज कलरमध्ये असणारं सिम कंपनीने प्रीव्ह्यूच्या वेळी लाँच केलं होतं. या रंगामधील सिमचा स्टॉक 5 सप्टेंबर पूर्वीचा आहे. नंबरसह हे सिम उपलब्ध असल्याने यामध्ये पोर्टेबिलीटीची सुविधा नाही.



ब्ल्यू पॉकेटमध्ये मिळणारं सिम कंपनीने ठरवलेल्या नंबरसह उपलब्ध आहे. या सिमचा नंबर eKYC प्रोसेस करताना जनरेट केला जातो. त्यामुळे या रंगाच्या पॉकेटमधील सिम घेताना ग्राहकांना आवडता नंबर घेता येत नाही.



ऑरेंज पॉकेटमध्ये असणारे सिम बाजारातून सध्या जवळपास संपलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता केवळ ब्ल्यू पॉकेटमधील सिमची विक्री केली जात आहे. दोन्हीही रंगांचे सिम खरेदी केलेल्या ग्राहकांना जिओच्या ऑफरचा फायदा 31 डिसेंबरपर्यंत मिळणार आहे.