मुंबई: चीनी कंपनी शाओमीनं 17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवस विशेष दिवाळी सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये कंपनी तीन दिवसांपर्यंत एक रुपयात फ्लॅश डील, किंमती सूट, कूपन आणि इतर दुसऱ्या ऑफर देणार आहे. दुपारी 2 वा. एक रुपयांचा फ्लॅश डील आयोजित करण्यात आला आहे. या सेलची फ्लॅश सेल हीच खासियत आहे. कारण की, यामध्ये यूजर्सना अवघ्या 1 रुपयात स्मार्टफोन मिळू शकतो.

पण अवघ्या 1 रुपयात स्मार्टफोन कसा मिळवायचा याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. पण काळजी करु नका. जाणून घ्या फ्लॅश सेलचा कसा फायदा घ्याल.

1. mi.com वर तुमच्या अकाऊंटवर तुम्ही सेल सुरु होण्यापूर्वी लॉग इन असणं गरजेचं आहे.

2. साईन अप झाल्यानंतर 'Share to Register'वर क्लीक करा. जर फ्लॅश सेलसाठी तुम्ही  नोंदणी केली नसेल तर त्या सेलमधून तुम्हाला काहीही मिळणार नाही. कारण की, हा सेल अवघ्या काही सेकंदासाठी असतो.

3.  'Share to register' केल्यानंतर तुम्हाला 'Coming soon' असं दिसू लागेल. म्हणजेच तुम्ही फ्लॅश सेलसाठी पात्र ठरला आहात.

4. फ्लॅश सेल सुरु झाल्यानंतर 'Coming soon' बटनाऐवजी 'Buy now' असं दिसून येईल.

5. प्रत्येक प्रोडक्टसाठी 'Buy now' हे बटण असणार आहे. त्यामुळे या सेलमध्ये जे-जे प्रोडक्ट असतील त्या-त्या प्रोडक्टच्या 'Buy now' बटणानावर तुम्हाला क्लीक करावं लागणार आहे. एकाच क्लीकनं तुम्ही दोन्ही प्रोडक्ट घेऊ शकत नाही.

6. तुम्ही योग्य वेळात जर ही सगळी प्रक्रिया पार पाडली तर तुम्ही लकी विनर ठरु शकता. त्यानंतर शाओमीचे एक रुपयातील प्रोडक्ट तुम्हाला मिळू शकतात.