मुंबई : आगामी सहा राज्यातील विधानसभा निवडणूका नजरेसमोर ठेवून निवडणूक आयोगाने फेसबुकवरुन मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सोशल नेटवर्किंग साईटवरुन मतदार नोंदणीची ही पहिलीच वेळ आहे.

देशभरातील सहा राज्यांमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. यात पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. फेसबुकवरील सुमारे 16 कोटी लोकांचा विचार करता निवडणूक आयोगाला मतदार नोंदणी करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने फेसबुकशी करार केल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आज स्पष्ट केलं आहे.

फेसबुकच्या या कॅम्पेनमध्ये युजर्सच्या टाईमलाईनवर मतदार यादीत नाव असल्याची विचारणा करण्यात येईल. ज्यांना मतदार यादीत आपले नाव नोंदवायचे असेल त्यांना नोंदणीच्या लिंकवर क्लिक करुन आपलं नाव नोंदवता येणार आहे. फेसबुकवर 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान हे विशेष कॅम्पेन चालवलं जाणार आहे.