नवी दिल्ली: वोडाफोनने आपल्या प्रीपेड ग्राहकांची रिचार्जच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी एक नवा प्लॉन लाँच केला आहे. या प्लॉनमुळे ग्राहकांची इंटरनेट, रोमिंग, एसएमएस आणि व्हॉईस कॉलसाठी वेगळे रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्ती झाली आहे.
या रिचार्ज अंतर्गत कंपनी एकाच किमतीत ग्राहकांना निश्चित संख्येत पॉईंट (फ्लॅक्स) देणार आहे. याच्या माध्यमातूनच व्हॉईस कॉल, डेटा यूज, एसएमएस, रोमिंग आदींचा बॅलेन्स कट होईल. या रिचार्जची मुदत 28 दिवसांची असणार असून, यानंतर अतिरिक्त किंमत देऊन अॅडिशनल पॉईट घ्यावे लागतील.
यासाठी वोडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांना 117 रुपयांचे एक रिचार्ज करुन 325 पॉईंटस (फ्लॅक्स) घ्यावे लागतील. यातून 1MB इंटरनेट (2G, 3G, 4G साठी समान दर असतील.) याच्या वापरावेळी ग्राहकाच्या खात्यातून काही पॉईट कट होतील. तसेच एका एसएमएस आणि एका मिनिटाच्या रोमिंगवरही अशाच प्रकारे पॉईट ग्राहकाच्या खात्यातून कट होतील. एका मिनिटाच्या आऊटगोइंग कॉल आणि एसटीडी कॉलसाठी ग्राहकाला 2 फ्लॅक्स पॉइंट द्यावे लागतील. रोमिंगमध्ये एका मिनिटाच्या आऊटगोईंग कॉलसाठीही समान दर असतील.
कंपनीने 117 रुपयापासून 395 रुपयेपर्यंतचे रिचार्ज उपलब्ध करुन दिले आहेत. हे रिचार्ज पॅक सर्कलनुसार बदलत राहितील.
''वोडाफोनचे जवळपास 90% ग्राहक हे प्रीपेड यूजर्स आहेत. त्यांना विविध प्लॅनचा लाभ घेण्यासाठी वेगवेळे रिचार्ज नेहमी करावे लागतात. त्यामुळे त्यांचा यामधील त्रास कमी करावा, यासाठी ही नवी योजना सुरु केल्याचे,'' कंपनीचे वाणिज्यिक संचालक संदीप कटारिया यांनी सांगितले.
दरम्यान, कंपनीने या नव्या स्किमच्या लाँचिंगसाठी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकी आणि बॉबी सिन्हा यांना ब्राण्ड अम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे.