मुंबई: रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोननं एक शानदार ऑफर आणली आहे.

या ऑफरमध्ये वोडाफोन ग्राहकांना अनलिमिटेड लोकल व्हॉईस कॉलसोबत 3जीबी 3जी इंटरनेट डेटा देणार आहे. ही ऑफर 28 दिवसांसाठी वैध असणार आहे. यासाठी यूजर्सना 449 रुपयाचं रिचार्ज करावं लागणार आहे. पण ही ऑफर फक्त आज म्हणजे ८ नोब्हेंबरपर्यंत वैध आहे.

ज्यांना वोडाफोनकडून या ऑफरचा एसएमएस आला आहे. त्यांनाच याचा फायदा घेता येणार आहे. 449 रुपयाचं रिचार्ज केल्यानंतर 4 तासानं हा पॅक यूजर्सच्या वोडाफोन नंबरवर अॅक्टिव्हेट होणार आहे. पण हा पॅक तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्ही कस्टमर केअरकडून सुनिश्चित करणं गरजेच आहे.



रिलायन्स जिओच्या लाँचिंगनंतर प्रत्येक टेलिकॉम कंपनीनं यूजर्सला आकर्षित करण्यासाठी स्वस्त प्लान आणले आहेत. त्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होत आहे.