नवी दिल्ली : व्हिव्होने मूनलाईट सेल्फी कॅमेरा फोन Y69 भारतात लाँच केला आहे. या फोनची किंमत 14 हजार 990 रुपये ठेवण्यात आली असून हा फोन 1 सप्टेंबरपासून अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी असेल. शिवाय तुम्ही या फोनची ऑफलाईनही खरेदी करु शकता.


व्हिव्होने यापूर्वीही V5 आणि V5 प्लस हे कॅमेरा फोन लाँच केले होते. आता Y सीरिजचा हा नवा स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे V5 प्लस पेक्षा या फोनची किंमत कमी ठेवण्यात आली आहे.

Y69 चे फीचर्स :

  • अँड्रॉईड 7.0 नॉगट

  • 5.5 इंच आकाराची एचडी स्क्रीन

  • 1.5GHz ऑक्टा कोअर मीडियाटेक प्रोसेसर

  • 3GB रॅम, 32GB इंटर्नल स्टोरेज

  • 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • फिंगरप्रिंट स्कॅनर होम बटण

  • 3000mAh क्षमतेची बॅटरी