VIVO Y33T : Vivo ने भारतात स्वस्त 5G स्मार्टफोनचा नवीन कलर व्हेरिएंट लॉन्च केला आहे. होळीच्या निमित्ताने कंपनीने VIVO Y33T मध्ये स्टाररी गोल्ड कलर लॉन्च केला आहे. आता हा स्मार्टफोन तीन कलरमध्ये खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल  Vivo Y33T मध्ये 6.58 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर, यात ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा आहे, तर इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सल्सचे आहेत. यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.


या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या परफॉर्मन्ससाठी यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन सुरुवातीपासूनच मिरर ब्लॅक आणि मिडी ड्रीम कलरमध्ये उपलब्ध होता. सुरक्षिततेसाठी, यात साईड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. 


हा 5G स्मार्टफोन आहे. यामध्ये मायक्रोएसडी कार्ड देखील इन्स्टॉल केले जाऊ शकते, ज्याच्या मदतीने स्मार्टफोनचे स्टोरेज 1 टीबी (1024 जीबी पर्यंत) वाढवता येते. फोनच्या पॉवर बॅकअपसाठी यामध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हे 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनची किंमत 18,990 रुपये आहे. गेमिंगसाठी स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा गेमिंग मोड आणि लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. Vivo Y33T मध्ये साईड पॉवर बटण आणि फेस वेक फीचर देण्यात आले आहे.


हा स्मार्टफोन ड्युअल सिम सपोर्टसह येतो आणि त्यात हायब्रीड सिम स्लॉट म्हणजे मेमरी कार्ड आणि 1 सिम किंवा 2 सिम एकाच वेळी इन्स्टॉल करता येतात. हा स्मार्टफोनGoogle च्या Android 12 बेस Funtouch OS 12 वर काम करतो.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha