Mobile Internet : देशातील मोबाइल ब्रॉडबॅण्ड युजर्सची संख्या मागील पाच वर्षात दुप्पटीहून अधिक वाढली आहे. सध्या देशात 76.5 कोटी मोबाइल ब्रॉडबॅण्ड युजर्स आहेत. नोकियाने जाहीर केलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. या अहवालानुसार 4जी डेटा ट्रॅफिक 6.25 पटीने वाढला आहे.
नोकियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि भारतातील प्रमुख संजय मलिक यांनी एमबीआयटी अहवाल प्रकाशित केला. त्यांनी म्हटले की, देशात वापरण्यात येणाऱ्या डेटा वापरात 4 जी इंटरनेटचा 99 टक्के हिस्सा आहे. 5 जी इंटरनेट आल्यानंतरही त्यापुढील काही वर्षात यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार, 2017 ते 2021 पर्यंत मोबाइल डेटाचा वापर सीएजीआरमध्ये वाढ झाली असून 53 टक्के झाला आहे. यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.
संजय मलिक यांनी सांगितले की, या दरम्यान, युजर्सकडून दरमहा वापरण्यात येणारा सरासरी डेटा तीन पटीने वाढून दरमहा 17 जीबी प्रति महिना झाला आहे. मागील पाच वर्षात मोबाइल ब्रॉडबॅण्ड युजर्सची संख्या 2.2 पटीने वाढली आहे. देशातील युवा पिढी दिवसाला सरासरी आठ तास ऑनलाइन असतात असेही या अहवालात नमूद केले आहे.
दरम्यान, मागील काही वर्षात देशातील टेलिकॉम क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली. रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर स्पर्धा आणखीच तीव्र झाली. जिओच्या मोफत इंटरनेट, कॉलिंगच्या प्लानमुळे अनेकांनी जिओला पसंती दर्शवली. तर, व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल या कंपन्यांनी इंटरनेट दर कमी करण्यासह वेगवेगळे प्लान लाँच केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Telegram : आता टेलिग्रामवर फाईल्स शोधणे अधिक सोपे होणार, लाईव्ह स्ट्रीमिंगचाही आनंद मिळणार, वाचा कंपनीचे 'हे' नवीन फीचर्स
- Clop Ransomware : ऑपरेटिंग सिस्टम हॅंग करणारा 'क्लॉप रॅन्समवेअर' मालवेअर, 'अशी' घ्या काळजी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha