Vivo Y16 4G : Vivo ने आपला नवा बजेट स्मार्टफोन Vivo Y16 4G भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 5000 mAh बॅटरीसह मजबूत प्रोसेसर देण्यात येत आहे. एवढेच नाही तर या स्मार्टफोनमध्ये इतरही अनेक फीचर्स आहेत. Vivo Y16 4G मध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, त्यासोबत 2MP दुय्यम कॅमेरा उपलब्ध आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP चा कॅमेरा ग्राहकांना दिला जात आहे. Vivo Y16 4G स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल आणि किंमतीबद्दल जाणून घेऊ



Vivo Y16 4G फिचर्स


Vivo Y16 4G स्मार्टफोनमध्ये 6.51 इंच HD+ डिस्प्ले आहे.
Vivo Y16 4G स्मार्टफोन Android 12 आधारित Funtouch OS 12 वर काम करतो.
प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर मीडियाटेक हेलिओ पी35 प्रोसेसर यात देण्यात आला आहे.
Vivo Y16 4G मध्ये ग्राहकांना 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे.
Vivo Y16 4G मध्ये RAM 2.0 उपलब्ध आहे, जे 1GB वर्चुअल रॅम देते.
Vivo Y16 4G स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यासोबत 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.


Vivo Y16 4G कॅमेरा


Vivo Y16 4G मध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, त्यासोबत 2MP दुय्यम कॅमेरा उपलब्ध आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP चा कॅमेरा ग्राहकांना दिला जात आहे.


Vivo Y16 4G किंमत


Vivo Y16 4G ची किंमत अद्याप सांगण्यात आलेली नाही. आतापर्यंत कंपनीने फक्त त्याच्या फिचर्सचा खुलासा केला आहे. अशा परिस्थितीत त्याची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला आणखी प्रतीक्षा करावी लागेल. कंपनीने फोनमध्ये स्टेलर ब्लॅक आणि ड्रिझलिंग गोल्ड असे दोन रंग पर्याय सादर केले आहेत. हे लवकरच भारतासह इतर अनेक देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल. जर तुम्ही ते खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.


Vivo V25 Pro 5G भारतात लॉन्च!


यासोबतच स्मार्टफोन ब्रँड Vivo ने आपला नवीन कॅमेरा फोन Vivo V25 Pro 5G देखील भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Vivo V25 Pro Vivo V23 Pro चा सक्सेसर म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. 64 एमपी रियर कॅमेरा सेटअपसह या फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आहे. तसेच फोनमध्ये कलर चेंजिंग बॅक पॅनल आहे. हा फोन ब्लॅक आणि सेलिंग ब्लू कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 6.53 इंचाची 3D स्क्रीन आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Infinix Note 12 Pro: 256 GB स्टोरेज असलेला सर्वात स्वस्त फोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत


Sony Xperia 5 IV 5G : Sony लवकरच लॉन्च करणार आपला  Waterproof Smartphone, जाणून घ्या