नवी दिल्ली : VIVO ने भारतात सेल्फी प्रेमींसाठी तब्बल 20 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असलेला VIVO v5 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. एवढा मोठा फ्रंट कॅमेरा असलेला हा जगातील पहिलाच फोन आहे. या फोनची किंमत 17 हजार 890 रुपये ठेवण्यात आली असून 26 नोव्हेंबरपासून विक्री सुरु होणार आहे. रात्रीही फ्लॅशच्या साहाय्याने सेल्फी काढता येऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये हायटेक फीचर्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याचंही कंपनीने सांगितलं. बाजारात हा फोन धुमाकूळ घालणार आहे, कारण स्मार्टफोनप्रेमी सेल्फी कॅमेरा पाहूनच फोन घेतात, असा विश्वास VIVO चे सीईओ केंट चेंग यांनी बोलून दाखवला. या फोनचं v5 प्लस हे अपडेटेड व्हर्जन लवकरच येणार असून यामध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा असेल, असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं. VIVO v5 चे फीचर्स
  • 5.5 इंच आकाराची एचडी स्क्रीन
  • 64 बिट 1.5GHz ओक्टाकोअर प्रोसेसर
  • 4 जीबी रॅम, 32 जीबी इंटरनल स्टोरेज
  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 20 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • फिंगप्रिंट सेन्सर
  • 3000mAh क्षमतेची बॅटरी