मुंबई: नोटाबंदीनंतर संपूर्ण देशात बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी भल्या मोठ्या रांगेत उभं राहावं लागतं. अशावेळी सरकारनं नागरिकांना दिलासादायक बातमी दिली आहे. लवकरच तुम्हाला तुमच्या घराजवळ मायक्रो एटीएम मिळू शकतं. त्यामुळे तुमची मोठ्या रांगेपासून सुटका होऊ शकते.


काय आहे मायक्रो ATM

केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांच्या मते, 'आम्ही ठरवलं आहे की, मोठ्या संख्येत मायक्रो एटीएम मशीन लावण्यात येतील. मायक्रो एटीएम संपूर्ण देशभरात पाठविण्यात येतील. .या एटीएममधून डेबिट कार्डच्या साह्य्यानं तुम्ही पैसे काढू शकाल. हे मायक्रो एटीएम सामान्य एटीएमप्रमाणे काम करेल आणि त्यातून तेवढेच पैस काढू शकाल जेवढे पैसे तुम्ही सामान्य एटीएममधून काढता.'

सरकारनं गावांमधील पैशाची समस्या दूर करण्यासाठी हा नवा उपाय शोधून काढला आहे.



- हे मायक्रो एटीएम बँक मित्र तुमच्या घरापर्यंत घेऊन येईल.

- याचा वापर करणं अगदी सोपं आहे.

- सर्वात आधी तुम्हाला डेबिट कार्ड स्वाईप करुन तुमच्या अंगठ्याचा ठसा त्या मशीनवर द्यावा लागणार आहे.

- त्यानंतर तुम्हाला तुमचा चार अंकी पिन टाकावा लागेल.

- त्यानंतर तुम्हाला आवश्यक तेवढी रक्कम काढता येणार आहे.

- पैसे काढल्यानंतर बँक मित्र तुम्हाला त्याची पावती देईल. तसंच तुमच्या पासबूकमध्ये त्याची एंट्री देखील करुन देईल.