मुंबई : फेसबुकवर तुम्ही फोटो अपलोड केला, की त्यावर येणारे लाईक्स आणि कमेंट्स या माध्यमातून तुमची पॉप्युलॅरिटी लक्षात येते. तुमचा फेसबुक डीपी कोणी पाहिलाय, हे साधारणपणे तुम्हाला समजतं, मात्र व्हॉट्सअॅपवर तुम्ही अपडेट केलेला डीपी कोणी पाहिलाय, हे समजलं तर?

 
Hi, Finally now we can see who checked our whatsapp dp, last seen, status. It was shocking to check who is stalking my whatsapp last seen and dp regularly. You too check yours at https://giftsfortasks.com/who-viewed

 
हा मेसेज तुमच्यापैकी अनेकांना व्हॉट्सअॅपवर आला असेल. स्पॅम म्हणून काही जणांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल, मात्र उत्सुकतेपोटी अनेकांनी या लिंकवर क्लिकही केलं असेल. क्लिक करणाऱ्या यूझर्सना या मेसेजमध्ये तथ्य नसल्याचं समजलं असेलच. कारण व्हॉट्सअॅपतर्फे अद्याप तुमचा डीपी, स्टेटस, लास्ट सीन कोणी पाहिलं हे सांगू शकणारं फीचर अधिकृतरित्या लाँच करण्यात आलेलं नाही.

 
हा मेसेज आणि लिंक फेक असल्याचं उघड झालेलं आहे. या लिंकवर क्लिक केल्यास व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक मेसेंजर त्याचप्रमाणे इतर काही अॅप्स डाऊनलोड करण्याची गळ घातली जाते. डीपी कोणी पाहिला, हे जाणून घेण्याच्या नादात अनेक यूझर्स नसती अॅप डाऊनलोड करतात आणि काहीही साध्य होत नाही.

 

त्यामुळे अशा फेक लिंक्स आणि मेसेजपासून सावध राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.