मुंबई : हल्ली वर्षागणिक किंवा दर दोन वर्षांनी स्मार्टफोन बदलला जातो. जेव्हा नवा स्मार्टफोन खरेदी करताना जुना स्मार्टफोन विकला जातो, त्यावेळी त्याची फारशी किंमत मिळत नाही. त्यामुळे अनेकजण स्मार्टफोन विकण्याऐवजी घरातच ठेवून देतात.
आता तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनचा पुनर्वापर करु इच्छित आहात, तर आम्ही तुम्हाला एक मस्त सजेशन देणार आहोत. शिवाय, स्मार्टफोन जुना असला, तरीही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतो. तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनचा वापर सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरा म्हणून करु शकता.
हल्ली घरी किंवा ऑफिसमध्ये सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची किंमत जास्त असल्याने ते महागात पडतात. त्यामुळे अनेकांना ते खरेदी करणं शक्य नसतं. अशावेळी जुन्या स्मार्टफोनला तुम्ही सीसीटीव्ही म्हणून वापरु शकतात. यासाठी तुमच्याकडे एखादा जुना स्मार्टफोन आणि त्यात एखादं अॅप असण्याची गरज आहे.
तुमच्या जुन्या स्मार्टफोनमध्ये खास सीसीटीव्हीसाठी उपलब्ध असलेले अॅप्स इन्स्टॉल करा. तुम्हाला अँड्रॉईड प्ले स्टोअरवर हे अॅप्स मिळतील. अशा अॅप्सच्या माध्यमातून सीसीटीव्ही सुरु करु शकता आणि तुमचा जुना स्मार्टफोनही चांगल्या पद्धतीने वापरात आणू शकता.