मुंबई : ओप्पो या स्मार्टफोन मेकर कंपनीने आपला नवा स्मार्टफोन A59 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 18 जूनपासून चीनमधील बाजारात उपलब्ध होणार आहे. मेटल बॉडी असलेला हा स्मार्टफोन सुमारे 18 हजार रुपये किंमतीचा आहे. गोल्ड आणि रोझ गोल्ड रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असेल.


 

या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाचा IPS डिस्प्ले, ज्याचं 720×1280 पिक्सेल रिझॉल्युशन असून, 267ppi पिक्सेल डेन्सिटी आहे.

 

1.5GHz ऑक्टा-कोर कॉर्टेक्स-A53 मीडियाटेक MT6570 प्रोसेसर, 3 जीबी रॅम यांमुळे या स्मार्टफोनकडे स्मार्टफोनप्रेमी आकर्षत होण्याची अधिक शक्यता आहे.

 

32 जीबी इंटरनल मेमरी, एसडी कार्डच्या सहय्याने मेमरी वाढवण्याची सुविधाही असणार आहे. 5.1 लॉलिपॉप ओएसवर हा स्मार्टफोन चालणार आहे.

 

13 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. 3075mAh क्षमतेची बॅटरी असून, कनेक्टिव्हिटीमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, मायक्रो-USB पोर्ट (OTG रेडी) आणि 3.5mm ऑडिओ जॅक यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.