मुंबई : चीनची स्मार्टफोन कंपनी लेईकोने नुकत्याच लॉन्च केलेल्या Le 1s हा स्मार्टफोनने रजिस्ट्रेशनच्या बाबतीत विक्रम केला आहे. 24 तासात तब्बल एक लाख लोकांनी फोनची नोंदणी केली आहे.


 

कंपनीने हा स्मार्टफोन 3 मे रोजी लॉन्च केला होता. या फोनचा पहिला फ्लॅश सेल 12 मे रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर या फोनची विक्री होईल

 

Le 1s ची किंमत 10,899 रुपये आहे. मात्र कंपनी सुरुवातीचे 1 लाख हॅण्डसेटची विक्री 9,999 रुपयांना करणार आहे. Le 1s हा एंट्री लेव्हलचा मात्र अतिशय उत्तम फीचर्सने सज्ज असा स्मार्टफोन आहे.

 

Le 1s स्मार्टफोनचे फीचर्स

 

स्क्रीन : Le 1s मध्ये 5.5 इंच HD स्क्रीन आहे.

रिझॉल्यूशन : 1080×1920 पिक्सल

प्रोसेसर : 64 बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर

रॅम : 3 GB रॅम

मेन कॅमेरा : 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

फ्रंट कॅमेरा : 5 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा

मेमरी : 32 GB  इंटरनल मेमरी

 

या स्मार्टफोनमध्ये "मिरर फिंगरप्रिंट सेन्सर" हे खास तंत्रज्ञान देण्यात आलं आहे.

 

Le 1s स्मार्टफोनमध्ये टाईप सी रिव्हर्सिबल केबलसह फास्ट चार्जिग सुविधा असेल. यामध्ये फोन 5 मिनिटांत एवढा चार्ज होईल की युझर 3.5 तास सहजपणे वापरु शकतो.

 

मध्ये आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड़, मल्यायम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ आणि तेलुगू अशा दहा  भारतीय भाषांना Le 1s हा स्मार्टफोन सपोर्ट करेल.