मुंबई : लोकप्रिय मॅसेजिंग अॅप WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा युजर्सनी विरोध केला. यावरुन व्हॉट्सअॅपला ट्रोलही करण्यात आलं होतं. पण तरिही व्हॉट्सअॅप युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत आहे. आता व्हॉट्सअॅप एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. ज्याच्या मदतीने युजर्स व्हिडीओ म्युट करुन पाठवू शकणार आहेत. सध्या या फिचरची टेस्टिंग सुरु आहे.


WhatsApp च्या अपडेट्स आणि नव्या फिचर्ससंदर्भात माहिती देणारी वेबसाईट WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, नव्या म्युट व्हिडीओ फिचरचं अॅन्ड्रॉईड बीटा वर्जन रिलीज करण्यात आलं आहे. नव्या फिचरसाठी बीटा युजर्सना आपलं व्हॉट्सअॅप व्हिडीओ अपडेट करावं लागणार आहे. अपडेटनंतर युजर्सना हे फिचर वापरता येणार आहे. दरम्यान, अद्याप हे म्युट फिचर सर्व युजर्ससाठी कधी उपलब्ध होईल, यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


असा करु शकता वापर 


WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसा, म्युट व्हिडीओ फिटर व्हिडीओ एडिटिंग स्क्रिनवर दिसणार आहे. हे फिचर वॉल्युम आयकॉनसारखं दिसणार आहे. यावर टॅप केल्यानं कोणत्याही युजरला व्हिडीओ पाठवण्यापूर्वी व्हिडीओ म्युट करता येणार आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्या ऑप्शन पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पहिल्याप्रमाणे इमोजी, टेक्स्ट आणि एडिट करु शकणार आहात.


महत्त्वाच्या बातम्या :