मुंबई: एखादी कार खरेदी करताना, मग ती महागडी असेल तर त्यामध्ये आपल्याला सर्वाधिक सुविधा असाव्यात तसेच त्यात गुणवत्ता असावी असं वाटतं. Kia Sonet आणि Nissan Magnite मध्ये तशा प्रकारचे बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. पण Toyota Urban Cruiser ही गाडीदेखील काही कमी नाही. आम्ही या तिनही गाड्यांची तुलना करायचा प्रयत्न केला आहे.


कारचा लूक
जर कारचा लूक चांगला नसेल तर ती कोणीही खरेदी करणार नाही. या तीनही गाड्यांचा लूक हा चांगला आहे. किया सोनेटमधून भविष्यातील झलक पहायला मिळते. हेडलॅम्प्ससोबत त्याचे ग्रिल आणि त्याचा विस्तारही मोठा आहे. ही कार एक प्रिमियम कार प्रमाणे आहे. निस्सानचा विचार करता ती थोडी लहान आहे पण तिचा अंदाजच काही वेगळा आहे. अर्बन क्रुजर टोयाटाचा लूक हा मारुती ब्रेझा प्रमाणे आहे. ही कार एक बॉक्स स्टाईलची आहे जी अनेकांना पसंत पडते.



इन्टेरियर, गुणवत्ता आणि फिचर्स
दहा लाखांच्या पेक्षा जास्त रुपये एखाद्या कारवर खर्च करत असताना कोणालाही वाटेल की त्या कारचे इन्टेरियर चांगले असावे. इन्टेरियरच्या बाबतीत किया सोनेट ही कार चांगली आहे. त्यामध्ये मोटी टचस्क्रीन टीव्ही आणि गुणवत्तापूर्ण इन्टेरियर मटेरियल आहे. एयर प्युरीफायरपासून ते वायरलेस चार्जर्स, बोस ऑडिओ, सनरुफ, कनेक्टेड टेक पल्स अशा अनेक सुविधा यामध्ये आहेत.



MG Motor इंडियाकडून नवी 'झेडएस ईव्ही 2021' लॉन्च, एकदा चार्ज केल्यावर गाठणार लांबचा पल्ला


इतर दोन गाड्या याच्या तुलनेत कमी पडतात. महत्वाचं म्हणजे निस्सान मॅग्नाइट स्वस्त असूनही अर्बन क्रूजरच्या तुलनेत त्याच जास्त फिचर्स आहेत. अर्बन क्रूजरमध्ये काही टेक्निकल सुविधा आणि इतर सुविधा कमी आहेत. तर निस्सान मॅग्नाइटमध्ये डिजिटल क्लस्टर, रियर एसी वेन्ट, वायरलेस चार्जर, लॅम्प आणि एक एयर प्यूरीफायर आहे.



या तिनही गाड्यांचा विचार करता निस्सान मॅग्नाइट स्वस्त आहे. त्याची किंमत 5.4 लाखांपासून सुरुवात होते आणि 9.4 लाखांपर्यंत जाते. ही दहा लाखांच्या आत येणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. कमी बजेट असणाऱ्यांसाठी निस्सान मॅग्नाइट एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला मोठी एसयूव्ही खरेदी करायची असेल तर अर्बन क्रुजर हा चांगला पर्याय होऊ शकतो. या गाडीची किंमत 8.5 लाख ते 11.5 लाख इतकी आहे. तर किया सोनेटची किंमत ही 6.7 लाख रुपये ते 13.2 लाख रुपये इतकी आहे. लुक्स, लॉन्ग फीचर लिस्ट, इंजिन किंवा ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा विचार करता ही गाडी चांगला पर्याय ठरु शकते.



TVS iQube Electric स्कूटर भारतात लॉन्च; काय आहे किंमत अन् फिचर्स?