UPI Payment In India : अनेकदा Google Pay, Paytm, PhonePe किंवा इतर कोणत्याही UPI पेमेंट सेवेचा वापर करताना अचानक इंटरनेट कनेक्शन बंद पडते. त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करून ही सेवा सुरळीत होते. अर्थात या प्रक्रियेला फार वेळ लागतो. शिवाय इंटरनेटचे कनेक्शनही स्ट्रॉंग असावे लागते. परंतु, अशावेळी तुम्ही जर (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा) (USSD) आधारित मोबाइल बँकिंग सेवा सुरु केली तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. याद्वारे तुम्ही पैसे मागवू आणि पाठवू शकता, UPI पिन बदलू शकता आणि इंटरनेट कनेक्शनशिवाय खात्यातली रक्कम तपासू देखील शकता. 


*99# सेवा देशभरातील सर्वांसाठी बँकिंग सेवा प्रदान करते. हे 83 बँका आणि 4 मोबाईल ऑपरेटरद्वारे ऑफर केले जाते आणि हिंदी आणि इंग्रजीसह 13 वेगवेगळ्या भाषांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. इंटरनेटशिवाय UPI पेमेंटसाठी, प्रथम तुमचा नंबर UPI वर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे आणि तोच क्रमांक तुमच्या बँक खात्याशी जोडला गेला पाहिजे. तुम्ही त्याच नंबरवरून *99# सेवा वापरू शकता.


*99# वापरून UPI ​​पेमेंट कसे करावे ?



  • स्मार्टफोनवरील डायल बटण उघडा आणि *99# टाइप करा, त्यानंतर कॉल बटणाला टच करा.

  • पॉपअप मेनूमध्ये, तुम्हाला एक संदेश मिळेल ज्यामध्ये 7 नवीन पर्याय येतील आणि 1 नंबरवर टॅप केल्यास, पैसे पाठवण्याचा पर्याय येईल. त्यावर टॅप करा.

  • ज्या व्यक्तीला पेमेंट करायचे आहे त्याचा नंबर टाइप करा आणि पैसे पाठवण्याचा पर्याय निवडा.

  • UPI खात्याशी संबंधित मोबाईल नंबर एंटर करा आणि पैसे पाठवा वर टॅप करा. 

  • तुम्हाला जी रक्कम पाठवायची आहे ती संख्या अंकात टाका आणि नंतर पैसे पाठवा आणि UPI पिन टाका.

  • पॉपअपमध्ये, तुम्हाला पेमेंटचे कारण लिहावे लागेल, तुम्ही पेमेंट का करत आहात, नंतर भाडे, कर्ज किंवा खरेदीचे बिल इत्यादी लिहा.

  • ही सेवा मोफत नाही, एकदा वापरण्यासाठी तुम्हाला 50 पैसे शुल्क द्यावे लागेल.

  • सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सेवेद्वारे सध्या फक्त 5000 रुपयांपर्यंतची रक्कम पाठवता येते.


महत्वाच्या बातम्या :