नवी दिल्लीः ऑनलाईन शॉपिंगचे फायदे आणि तोटे काय असतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. चोरी गेलेल्या दोन कार ओएलएक्स या ऑनलाईन साईटवर सापडल्या आहेत.
ओएलएक्सवर जाहिरात देण्यासाठी शालिमार बाग हे दिल्लीचे नागरिक सर्फिंग करत होते. सर्फिंग करताना त्यांना त्यांचीच एसयूव्ही ही चोरी गेलेली कार विक्रीसाठी उपलब्ध असलेली आढळून आली. शालिमार यांनी आपल्या गाडीविषयी सर्व माहिती पाहिली असता ती कार त्यांचीच असल्याचे निष्पन्न झाले.
नोएडाचे कुलवंत सिंह यांनाही मागच्या महिन्यात असाच अनुभव आला. ओएलएक्सवर त्यांचीच चोरी गेलेली होंडा सिटी कार विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं आढळून आलं.
दरम्यान या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कार चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीची चौकशी केली आहे. कुलवंत सिंह यांच्या कार प्रकरणी झुलफिकर नावाचा आरोपी असल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. कार चोरी करणाऱ्या इश्तियाक इसरार या टोळीच्या इश्तियाक अलिला पोलिसांनी अटक केली आहे.