मुंबई : एकीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडलं, तर दुसरीकडे ट्विटर संमेलनाचीही सांगता झाली. 3 फे 6 फेब्रुवारी या चार दिवसात ट्विटरवरील मराठी यूझर्सनी एकत्र येत मोठ्या उत्साहाने विविध विषयांवर आपापली मतं मांडली, ब्लॉग, कविता, लेख शेअर केले. ‘मराठी वर्ड’ या ट्विटर हँडलने ‘ट्विटर संमेलन’ आयोजित केलं होतं.


मराठी भाषा, संस्कृती, साहित्य इंटरनेटच्या माध्यमातून दूरवर पोहोचावं, यासाठीचा हा प्रयत्न होता. ट्विटर संमेलनाला मराठी यूझर्सकडून मिळालेला प्रतिसाद पाहता, प्रयत्न यशस्वी झाल्याचं दिसून आले. भारतासह परदेशातील मराठी ट्विटर यूझर्सनी गेल्या चार दिवसात ट्विटर संमेलनात सक्रीय सहभाग नोंदवला, हे विशेष म्हणता येईल.

यंदा ट्विटर संमेलनात 12 हॅशटॅग वापरुन व्यक्त होण्याचं आवाहन करण्यात आले होते. कविता, ब्लॉग, कथा, छंद इत्यादी गोष्टींवर जे काही असेल, ते शेअर करण्यास सांगण्यात आले होते. त्याला अनुसरुन ट्विटरवरील मराठी यूझर्सनी भरभरुन प्रतिसाद दिला.

कोणत्या 12 हॅशटॅगचा वापर करण्यात आला?

#माझीकविता
#माझीकथा
#माझाब्लॉग
#माझीबोली
#साहित्यसंमेलन
#वाचनिय
#हायटेकमराठी
#बोलतोमराठी
#मराठीशाळा
#भटकंती
#खमंग
#माझाछंद