मुंबई : गुगलचा पिक्सेल हा स्मार्टफोन खरेदी करण्याची सध्या सुवर्णसंधी आहे. 57 हजार रुपये किंमतीच्या या फोनवर सध्या 29 हजार रुपये एवढी भरघोस सूट मिळवता येऊ शकते. फ्लिपकार्टवर 20 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर आहे, तर सिटी बँकेच्या डेबिट कार्डवर 9 हजार रुपये कॅशबॅक मिळत आहेत.


गूगलच्या पिक्सेल फोनची बॅटरी आणि कॅमेरा हा त्याचं खास आकर्षण मानलं जातं. बॅटरी केवळ 15 मिनिटात चार्ज होते, तर 7 तासांचा बॅकअप आहे. व्हिडिओ क्वालिटीसाठी यामध्ये व्हिडिओ स्टेबिलायझर देण्यात आलं आहे. पिक्सलच्या कॅमेऱ्यातून कमीत कमी सेकंदात फोटो काढता येतील. तसंच HDR+ पेक्षा पिक्सलच्या कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली असेल, असा दावाही गुगलने केला आहे.

फीचर्सः

  •  अॅल्यूमिनिअम बॉडी

  • 2×2.15GHz आणि 2×1.6GHz क्वाड कोअर प्रोसेसर

  • 4GB रॅम

  • 32GB स्टोरेज

  •  12 मेगापिक्सेलचा सेंसर

  • 2700mAh आणि 3450mAh क्षमतेची बॅटरी (दोन व्हर्जन)


संबंधित बातम्या :

भारतात गूगल पिक्सेल, पिक्सेल XL प्री बुकिंग सुरु


गूगलचे पिक्सेल, पिक्सेल XL स्मार्टफोन लाँच