ट्विटरमधील बग शोधणाऱ्या भारतीयाला घसघशीत इनाम
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2016 05:59 AM (IST)
न्यूयॉर्क : ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवरील बग अर्थात त्रुटी शोधणाऱ्या एका भारतीयाला ट्विटरतर्फे बक्षीस देऊन गौरवण्यात आलं आहे. अविनाश सिंग नावाच्या व्यक्तीला 10 हजार 80 डॉलर्स (अंदाजे 6 लाख 80 हजार रुपये) इनाम म्हणून देण्यात आले आहेत. अविनाश संगणक सुरक्षा संशोधक म्हणून कार्यरत आहे. मार्च महिन्यात त्याने ट्विटरमधील एक त्रुटी त्यांच्या लक्षात आणून दिली. यामुळे कॅशे कोड ऑनलाईन अॅक्सेस करता येत असे. ट्विटरने हा बग सुधारला आणि अविनाशलाही बक्षीस देऊ केलं. ट्विटरच्या 140 कॅरेक्टर लिमिटमुळे ट्विटरच्या बग बाऊण्टी पारितोषिकांची रक्कम 140 डॉलरच्या पटीत असते.