Twitter News : सध्या सोशल मीडियावर ट्विटर (Twitter News) आणि ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ट्विटर विकत घेतल्यापासूनच मस्क यांनी एकापाठोपाठ एक घोषणांचा धडाकाच लावला आहे. कधी कर्मचारी कपात, कधी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, तर कधी ट्विटर व्हेरिफाइट अकाउंट्सना भराव्या लागणाऱ्या पैशांबाबतची घोषणा. या ना त्या कारणावरुन ट्विटर आणि एलॉन मस्क चर्चेत आहेत. आता पुन्हा चर्चा रंगली आहे ती, ट्विटर अकाउंटसाठी भराव्या लागणाऱ्या पैशांची. म्हणजेच, तुम्हाला ट्विटर अकाउंट वापरण्यासाठी प्रतिमाह काही रक्कम भरावी लागणार आहे. मग तुम्हाला ब्ल्यू टिक असो वा नसो, तुम्हाला ट्विटर वापरण्यासाठी पैसे भरावे लागणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर काही दिवसांतच ट्विटरवर व्हेरिफाइड असणाऱ्या अकाउंट्सबाबत एक महत्त्वाची घोषणा केली. ट्विटरवर ब्ल्यू टिक असेल तर ते अकाउंट वापरण्यासाठी तुम्हाला प्रतिमाह 650 रुपये ट्विटरला द्यावे लागणार होते. पण आता व्हेरिफाइड अकाउंट नसेल तरी ते वापरण्यासाठी युजर्सना पैसे भरावे लागणार आहेत.
तुम्ही Twitter वापरकर्ता असाल आणि तुमच्याकडे ब्लू टिक नसेल, तरीही तुम्हाला शुल्क भरावं लागणार आहे. ट्विटरची कमान हातात येताच एलॉन मस्क यांनी अनेक कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली. सर्वात आधी त्यांनी त्यांनी ट्विटरच्या उच्च पदांवरील अधिकाऱ्यांना पायऊतार केलं. त्यानंतर ज्या युजर्सना ब्लू टिक आहे, त्यांना धक्का दिला. मस्कनं जाहीर केलं होतं की, ब्लू टिक असणाऱ्या युजर्सना दरमहा सुमारे 650 रुपये मोजावे लागतील. या निर्णयामुळे अकाउंट व्हेरिफाइड असणारे युजर्स गोंधळात पडले होते. तर आता असं बोललं जात आहे की, तुम्ही ब्लू टिक युजर्स नसलात तरीही तुम्हाला ट्विटर वापरण्यासाठी काही रक्कम मोजावी लागणार आहे.
कंपनी ऑफर करणार मंथली प्लान
ट्विटर वापरण्यासाठी काही पैसे मोजावे लागणार असल्याच्या चर्चा होत आहेत. पण अद्याप ट्विटरकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलॉन मस्क यांनी अलीकडेच कंपनीच्या कर्मचार्यांसह एक बैठक घेतली. ज्यामध्ये सध्याच्या ट्विटर युजर्सना एका महिन्याचा मर्यादित वेळ दिला जाईल, त्यानंतर कंपनीकडून युजर्सना मंथली प्लान ऑफर केला जाईल. हा प्लान घेतल्यानंतरच यूजर्स पुन्हा ट्विटर अकाउंट वापरु शकतील.
एलॉन मस्क यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ट्विटर चर्चेत
एलोन मस्क यांनी ट्विटरवर पदभार स्वीकारल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खूप चर्चेत आहे. मस्क दिवसागणिक काही ना काही बदल करण्यात गुंतलेले आहेत. ट्विटरवर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते, असंही वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं आहे. तसेच, त्यापूर्वी काही अधिकाऱ्यांना पायऊतारही व्हावं लागलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ट्विटरवर ब्लू टिक मिरवायचीये तर पैसे मोजा! एलन मस्क दरमहा शुल्क आकारणार?