Lava Smartphone : जर तुम्ही नवीन स्मार्टफोनच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाटी आहे. लावा कंपनीने नुकताच बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे डिझाईनही अतिशय आकर्षक आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये चांगल्या फोटो क्वालिटीसाठी 50MP कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच या 5G स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आणि MediaTek Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे. हा 5G स्मार्टफोन Samsung, Oppo आणि Xiaomi च्या 5G स्मार्टफोनशी स्पर्धा करणार आहे. 


लावा ब्लेझ 5G चे वैशिष्ट्य :



  • 6.5 इंच एलसीडी स्क्रीन

  • MediaTek Dimensity 700 चिपसेट

  • 50MP कॅमेरा

  • 3GB आभासी रॅम

  • 5000 mAh बॅटरी


यासोबत कंपनीने या 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन Widevine L1 ला सपोर्ट करते. उत्तम कार्यक्षमतेसाठी यात MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 4GB RAM, 3GB व्हर्च्युअल रॅम आणि 128GB स्टोरेज क्षमता आहे. ज्याला मायक्रो SD कार्ड वापरून 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.


बॅटरी कशी असेल? 


Lava Blaze 5G स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी 5000 mAh बॅटरी आहे. तसेच, सुरक्षेसाठी फेस अनलॉक आणि साईड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर वैशिष्ट्य आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटी पर्याय म्हणून WiFi, Bluetooth, GPS आणि USB Type-C सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.


Android OS आणि कॅमेरा


हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टम (OS) वर काम करतो. त्याच वेळी, या स्मार्टफोनमध्ये 50 MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप वापरण्यात आला आहे. याच्या मदतीने तुम्ही 2k फॉरमॅटमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता.


स्मार्टफोनची किंमत नेमकी किती?   


Lava चा हा 5G स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट Amazon India वर 9,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे, पण हा मोबाईल कधी सेलला जाईल. ते अद्याप जाहीर झालेले नाही.


या 5G स्मार्टफोनशी करणार स्पर्धा 


भारतीय बाजारपेठेतील पहिले 5G मोबाईल फोन किंमतीच्या दृष्टीने खूपच महाग आहेत. ज्यामध्ये Samsung Galaxy S22 Ultra 5G, ज्याची किंमत जवळपास 90,000 रुपये आहे. Xiaomi 12 Pro 5G, ज्याची किंमत सुमारे 40,000 आहे. One Plus 10 Pro 5G, ज्याची किंमत सुमारे 50,000 रुपये आहे.


महत्वाच्या बातम्या : 


Apple iPhone यूजर्ससाठी आनंदाची बातमी! 'या' दिवसापासून 5G सेवा वापरता येणार, जाणून घ्या