ट्विटर इंडियानं आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडिओ ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे. ट्विटरनं पाच हॅशटॅग तयार केले असून या पाचही हॅशटॅगनंतर ही इमोजी येणार आहे.
या संपू्र्ण आठवड्यात हे हॅशटॅग वापरावे असं आवाहन ट्विटर इंडियानं केलं आहे. गेल्या वर्षी गुगलनं खास डूडल तयार करुन बाबासाहेबांना अभिवादन केलं होतं. त्याच धर्तीवर आता ट्विटरनंही हे खास इमोजी तयार केले आहेत.
या पाच हॅशटॅगवर इमोजी
#AmbedkarJayanti
#अंबेडकरजयंती
#DalitLivesMatter
#JaiBhim
#जयभीम