मुंबई : मायक्रोब्लॉगिंग साईट्समधील जायंट मानल्या जाणाऱ्या ट्विटरने भारतीय यूझर्सना आकर्षित करण्यासाठी ‘ट्विटर लाईट’ अॅप लॉन्च केलं आहे. हायस्पीड इंटरनेटवरच ट्विटर पटापट अपडेट होतो, असा समाज खोडीत काढण्यासाठी हे नवीन अॅप मदतगार ठरणार आहे.

भारतीतील यूझर्स आता स्लो स्पीड इंटरनेटवरही हायस्पीड ट्विटर वापरु शकतील. ट्विटरने ‘लाईट’ अॅपसाठी व्होडाफोन या टेलिकॉम कंपनीला ग्लोबल पार्टनर बनवलं आहे.

ट्विटर लाईट अॅप मोबाईल डेटावर चालणारं व्हर्जन असून, हे सध्याच्या अॅपपेक्षा 30 टक्के अधिक वेगवान आणि 70 टक्के कमी डेटामध्ये काम करेल. मात्र, यासाठी यूझर्सना आपल्या मोबाईलमधील ‘डेटा सेव्हर मोड’ ऑन करावं लागेल. विशेष म्हणजे एक एमबीपेक्षाही कमी डेटात तुम्हाला ‘ट्विटर लाईट’ अॅप वापरता येणार आहे.

ट्विटरच्या लाईट अॅपमध्ये आणखी एक आकर्षित करणारी गोष्ट आहे, ती म्हणजे जरी तुमचा इंटरनेट डेटा काही क्षणांसाठी खंडीत झाला, तरी ट्विटर तुम्हाला ऑफलान सेवा पुरवेल. यामुळे ट्विटर स्लो झालंय किंवा इंटरनेट डेटामुळे काहीच अपडेट होत नाही, अशा तक्रारींना वाव मिळणार नाही.

आता भारतातील ट्विटर यूझर्सन लाईट अॅपला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

https://twitter.com/maya_hari/status/849871660022935552